Chandrashekhar Bawankule to Nana Patole : '..तर नाना पटोलेंवर ही वेळ आली नसती' ; बावनकुळे यांनी सल्ला देत टोलाही लगावला!

Chandrashekhar Bawankule on Mahavikas Aghadi News : 'महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार याचीच स्पर्धा लागली होती. प्रत्येक नेता स्वतःसाठी...' असंही बावनकुळे यांनी म्हटलं..
Bawankule and Patole
Bawankule and PatoleSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule News : 'लोकसभेच्या निवडणुकीत 31 खासदार निवडून आले तेव्हा काँग्रेसने ईव्हीएमवर शंका घेतली नाही. आता विधानसभेच्या निवडणुकीत भूईसपाट झाल्याने ते ईव्हीएमवर खापर फोडत आहे. त्यापेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण ईव्हीएमध्ये का पराभूत झालो आणि लोकांनी काँग्रेसला का नाकारले याचे आत्मपरीक्षण करावे, चिंतन करावे.' असा सल्ला देऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला.

तसेच बावनकुळे म्हणाले, 'नाना पटोले(Nana Patole) ईव्हीएमध्ये पराभूत झाले होते. पोस्टल मतांमुळे ते अवघ्या अडीचशे मतांनी विजयी झाले आहेत. आपल्या मतदारासंघात काही विकास कामे केली असती, लोकांसोबत संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. मी मुख्यमंत्री होणार असे ते सांगत होते. प्रचार सभांमधून आपल्या जिल्ह्यातील माणूस मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगून त्यांनी मते मागितली. त्याला काही लोक भुलले म्हणून ते निवडून आले.'

याशिवाय 'लोकसभेच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. लगेच आम्ही त्याचे आत्मपरीक्षण केले. कुठे चुकलो, नागरिकांना काय हवे याचा अभ्यास केला. त्यानुसार योजना आखल्या. आम्हाला जनतेनी भरभरून दिले. तब्बल 55 टक्के मते महायुतीला मिळाली. आघाडीला फक्त 32 टक्के मतदान झाले आहे. याची चिंता काँग्रेसने करण्याची गरज आहे.'असंही बावनकुळेंनी सांगितले.

Bawankule and Patole
Chandrakant Patil On Mahayuti : 'महायुती फक्त सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांची मोळी नाही, तर...' ; चंद्रकांत पाटलांचं विधान!

याचबरोबर 'विधासभेसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. दोन्हीकडे ईव्हीएमवरच मतदान घेण्यात आले. नांदेडमध्ये आघाडीचा खासदार निवडून आला. मात्र आघाडीच्या एकाही नेत्याने ईव्हीएमवर शंका व्यक्त केली नाही. ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले तेथील ईव्हीएम योग्य आणि पराभूत झाले त्या मतदारसंघात ईव्हीएमवर मॅनेज केल्या होत्या हे आरोप कोणालाही पटण्यासारखे नाही.'' असंही यावेळी बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी बोलून दाखावलं.

Bawankule and Patole
Ajit Pawar on Mahayuti Government : एकनाथ शिंदेंच्या पत्रकारपरिषदेवर बोलताना अजितदादांनी महायुतीच्या नव्या सरकारचा 'फॉर्म्युला'च सांगितला, म्हणाले...

तसेच 'महाविकास आघाडीचा(Mahavikas Aghadi) जनाधार दिवसेंदिवस घटत चालला आहे. 2019च्या निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीला बहुमत मिळाले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केली म्हणून त्यांचे सरकार आले. तेही टिकवता आले नाही. महायुती एकत्रित लढली. मुख्यमंत्रिपदासाठी नाही. उलट महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार याचीच स्पर्धा लागली होती. प्रत्येक नेता स्वतःसाठी लढल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com