Snehal Jagtap : भाजपचे महाडमध्ये 'ऑपरेशन लोटस'? स्नेहल जगताप यांच्या प्रवेशानं कशी गणितं बदलणार?

UBT Snehal Jagtap To Join BJP : ठाकरे गटाच्या नेत्या तथा शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर आहेत. यामागे नेमकं कारण काय? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
Snehal Jagtap
Snehal JagtapSarkarnama
Published on
Updated on

Snehal Jagtap News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा एका राजकीय भूकंप होण्यास सुरूवात झाली आहे. कोकणातील एक बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला असून पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यापाठोपाठ आता महाडमध्ये ठाकरे गटाला नेतृत्व देणारी व्यक्तीच भाजपच्या गळाला लागल्याने कोकणात ठाकरेंची ताकदच संपुष्ठात येणार आहे. तर महाडमध्ये भाजपला अशी काय अडचण येतेय की स्नेहल जगताप यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यामागे भाजपला सुसंस्कृत चेहरा हवा की कोकणात ऑपरेशन लोटस राबवायचे आहे अशीही शंका आता उपस्थित केली जात आहे.

भाजपने 2029 साली शतप्रतिशत भाजप असा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपने कोकणात ऑपरेशन लोटस हाती घेतलं असून सध्याच्या घडीला ठाकरे यांची शिवसेनेला लक्ष करण्यात आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर मंत्री अशिष शेलार हे कोकणात भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर आता महाडमधील भरत गोगावले यांना पर्याय असणारा चेहरा स्नेहल जगताप यांनी भाजपचा रस्ता धरला आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश ठरला केवळ योग्य वेळेची वाट पाहिली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. तर सध्याच्या घडीला कोकणात आणि रायगडमध्ये भाजप वरचढ असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा इतर कोणत्याही तेथे भाजपला सोबत घ्यावेच लागणार आहे. भाजपची वाढलेली ताकद आणि सहज मिळणारा प्रवेश यामुळेच कदाचित स्नेहल जगताप भाजपकडे जात असाव्यात. स्नेहल जगताप या सध्याच्या घडीला ठाकरे गटाचे नेतृत्व असून सर्व पदाधिकारी त्यांना मानतात.

तर त्या काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून सुसंस्कृत नेत्या आहेत. तर त्यांनी आपल्या नगराध्यक्ष कार्यकाळात महाडसाठी धडाडीने काम केलं होते. या कामाच्या धडाडीवरच ठाकरे गटात प्रवेश मिळाला होता. प्रवेशानंतर स्नेहल जगताप यांना शिवसेनेनं भरत गोगावले यांच्याविरोधात त्यांना उतरवले होते. यावेळी यांचा पराभव झाला होता. मात्र त्यांनी 91 हजार 232 मते मिळवली होती. त्यांच्या पराभवामुळे शिवसेनेत निराशा पसरली होती. यामुळे आता आपले राजकीय भवितव्य काय असा सवाल स्नेहल जगताप यांचे समर्थक करत होते.

Snehal Jagtap
Nana Patole यांची Uddhav Thackeray यांच्यावर नाराजी |MVA | Congress| Snehal Jagtap|Sarkarnama Video

भाजपच्या हाती मोहरा

स्नेहल जगताप यांच्यामुळे भाजपला ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद संपवता येणार असून भरत गोगावले यांच्यावर देखील वचक निर्माण करता येणार आहे. स्नेहल जगताप भाजपच्या गळाला लागल्यास दक्षिण रायगडमध्ये भाजप वाढण्यास मदत मिळणार आहे. तर यामुळे येथे शिवसेना ठाकरे गट नेतृत्वहीन होईल. यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील भाजपबरोबर येण्याची शक्यता आहे.

निष्ठावंत शिवसेनेत जातील?

स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे आतापासूनच शिवसेना शिंदे गट सक्रीय झाला आहे. शिवेसेनेची ताकद वाढवण्यासाठी निष्ठावंतांना आपल्याकडे खेचण्याची रणनीती आखत आहेत. तर थेट भरत गोगावलेच यासाठी पुढाकार घेत असून ते भाजपकडे निष्ठावंतानी न जाता आपल्याकडे या असा संदेश पाठवत असल्याचेही चर्चा सध्या येथे सुरू आहे.

स्नेहल जगताप यांची भूमिका काय?

भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्नेहल जगताप अस्वस्थ झाल्या असून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर आपली भाजपच्या कोणत्याची नेत्याशी ना चर्चा झाली ना बैठक झाली असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीसाठी बैठकीला आपण ‘मातोश्री’वर गेलो असता अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्या चुकीच्या असल्याचे स्नेहल जगताप यांनी सांगितले.

Snehal Jagtap
LIVE : Uddhav Thackeray प्रवेश करणाऱ्या Snehal Jagtap यांचे खणखणीत भाषण | Shivsena UBT | Sarkarnama

पण स्नेहल जगताप यांची भाजपकडे जाण्याचे अनेक कारणे असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका हे महत्वाचे कारण मानले जात आहे. त्या सत्ताधारी पक्षात गेल्यास नगरपालिकेच्या महत्वाच्या कामासाठी निधी आणू शकतात. तसेच जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि तीन आमदारांकडूनही महाडसाठी मोठ्या निधीची तरतूद करता येईल, असाही त्यांचा विचार असू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com