Mumbai News : विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास 13 दिवस झाले आहेत तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यानंतरही महाविकास आघाडीमधील जागावाटपाची चर्चा सुरूच आहे.
त्यातच आता महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. राज्यात सोलापूर दक्षिण, परंडा या दोन जागेवरून आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. या दोन मतदारसंघात उमेदवार आमनेसामने आल्याने आता कोण माघार घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या ठिकाणी दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार राहुल मोटे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
त्यामुळे या मतदारसंघातून ठिकाणी दोन्ही उमेदवार निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता कोणाची समजूत काढली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी काँग्रेसने (Congress) चौथी यादी जाहीर केली. त्यामध्ये सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून दिलीप माने (Dilip Mane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती.
अमर पाटील हे सॊमवारी आपला अर्ज देखील जाहीर करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे.
सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढत होणार की ठाकरे गट उमेदवारी माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोलापूर दक्षिण, परंडा या दोन जागेवरून आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे येत्या काळात या दोन्ही ठिकाणी कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे या वादावर कसा तोडगा काढला जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.