Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधी? आदिती तटकरेंची कोंडी, शेवटच्या क्षणी फडणवीस, पवार अन् शिंदेंकडे दाखवले बोट

Budget Session 2025 Mahayuti Government Minister Aditi Tatkare opposition questions 2100 scheme rupees ladki bahin yojana : लाडकी बहिणी योजनेत 2100 रुपये कधी देणार यावर महायुती सरकारच्या मंत्री आदिती तटकरेंना विरोधकांना उत्तर देताना दमछाक झाली.
Aditi Tatkare
Aditi Tatkare Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Government : लाडकी बहीण योजनेत निधीची तरतूद करताना महायुती सरकारची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांवरून पॉईंटेड उत्तर मागितल्याने मंत्री आदिती तटकरे यांची चांगलीच कोंडी झाली.

मंत्री तटकरे यांनी स्वतःला या कोंडीतून सोडवताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले. महायुतीकडून गोल-गोल उत्तर मिळायला लागल्यावर विरोधकांनी सभात्याग केला.

महायुती (Mahayuti) सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? असा प्रश्न करताना पाॅईंटेड उत्तराची अपेक्षा महायुती सरकारकडून केली. 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का? असा सवाल केला?

Aditi Tatkare
Satish Bhosale arrested : 'खोक्या'ला मदत करणारे सहआरोपी होणार; पोलिस अधीक्षक नवनीत कावतांनी उचललं मोठं पाऊल

आमदार रोहित पवार यांनी अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले होते, त्यांचे मानधन दिलं नसल्याकडे लक्ष वेधले. नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेगळी ठेवावी. कृषी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या माहीत असतानाही तुम्ही त्यांना निवडणूक (Election) काळात पैसे दिले. मात्र आता त्यांना देत नाही याचा अर्थ निवडणुकीसाठी त्याचा वापर केला का? असा सवाल केला. आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडकी बहिणींना निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर किती महिलांना लाभ दिला, याची विचारणा केली.

Aditi Tatkare
Almatti Dam : 'आलमट्टी’च्या उंचीचा घाट? कर्नाटकचे मनसुबे भाजप मंत्री विखे उधळणार, 'सर्वोच्च' न्यायालयात घेरणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना मानधन देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असं म्हटलं. ⁠नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये दिले जातात. त्यांना वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. ⁠लाडकी बहीण योजनेत सरकार निर्णयानुसार नमूद केलं आहे की 1500 पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही, याकडे आदिती तटकरेंनी लक्ष वेधले.

ऑक्टोबर 2024 मध्ये 2 कोटी 33 लाख 64 हजार महिलांना, तर फेब्रुवारी 2025 मध्ये 2 कोटी 47 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम देण्यात आली. 2100 रुपये कधी देणार, यावर बोलताना आदिती तटकरेंनी ठोस उत्तर न देता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे सांगून वेळ मारून नेली. आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, असेही आदिती तटकरे यांनी म्हटले.

विरोधकांचे मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रश्नांमुळे समाधान झाले नसल्याने त्यांनी सभात्याग केला. विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींची फसवणूक केली म्हणून, आम्ही लाडक्या बहि‍णींसाठी सभात्याग केल्याचे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com