Sharad Pawar And Nilesh Lanke : शरद पवार जाम खूष; आमदार जगतापांना जमलं नाही ते, लंकेंनी करून दाखवलं...

Sharad Pawar is happy with Nilesh Lanke : नीलेश लंके यांच्या विजयामुळे शरद पवार यांचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विजयाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या विजयामुळे शरद पवार खुश आहे. नीलेश लंके यांची उमेदवारी निश्चित करण्यात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि राजेंद्र फाळके यांचा मोठा वाटा आहे.
Sharad Pawar Nilesh Lanke sangram jagtap
Sharad Pawar Nilesh Lanke sangram jagtapsarkarnama

Ahmednagar Lok Sabha Election : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा खासदार असावा, शरद पवार यांची ही इच्छा नीलेश लंके यांच्या रुपानं पूर्ण झाली. नीलेश लंके यांच्या रुपानं मिळालेल्या यशामुळं शरद पवार जाम खूश आहे. आमदार संग्राम जगताप यांना गेल्या पंचवार्षिकला 2019 मध्ये जे जमलं नाही, ते नीलेश लंके यांनी करून दाखवलं, अशी चर्चा शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचे शरद पवार यांचे स्वप्न पुन्हा अधुरे राहते की, काय अशी चर्चा होती. परंतु नीलेश लंके यांना अजित पवार यांच्याकडून खेचून आणत शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपसमोर उभं केलं. नीलेश लंके यांनी विजय झाल्यानंतर आज शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. नगर दक्षिणेतील विजयाचा आनंद नीलेश लंके यांच्यापेक्षा शरद पवार अधिक दिसत होता.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या पंचवार्षिकला 2019 मध्ये आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. शरद पवार यांनी त्यावेळी पाच सभा घेतल्या होत्या. आमदार जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांनी विखेंवर केलेली टीका विशेष गाजली. त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबर विखे परिवारातील डाॅ. अशोक विखे देखील त्यांच्याबरोबर होते. तरी देखील शरद पवार यांचे सीट येथे पडले.

भाजपचे (BJP) सुजय विखे यांनी आमदार जगताप यांचा तब्बल 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला. सुजय विखे यांना तब्बल 7 लाख 4 हजार 660 मते मिळाली होती तर, जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मतं मिळाली होती. या पराभवानंतर विधानसभेच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी आपली आमदारकी राखली. शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांचा त्यांनी पराभव केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुजय विखे आणि संग्राम जगताप यांचे 2019 च्या निवडणुकीनंतर सुजय आणि संग्राम मैत्रीपर्व सुरू झालं. ही मैत्रीपर्व नगर शहराच्या विकासासाठी सुरू झाल्याचं दोन्हींकडून सांगण्यात आलं. या मैत्रीपर्वामुळे सुजय-संग्राम यांच्यातील 2019 मधील निवडणुकीच्या मैदानातील लढाईवर शंका देखील घेतली जाऊ लागली. यातून यावेळी शरद पवार अधिक सावध झाले. पक्ष फुटीनंतर आमदार जगताप यांनी अजित पवार यांची साथ केली.

Sharad Pawar Nilesh Lanke sangram jagtap
BJP Chitra Wagh On Nilesh Lanke : नीलेश लंकेंच्या विजयाचा 'राक्षसी' पॅटर्न; चित्रा वाघ यांनी सर्वच काढलं...

शरद पवार यांचे नगर दक्षिण काबिज करण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून धडपड होती. अहमदनगरमधून 2009 आणि 2014 मध्ये सलग दोन वेळा भाजपचेच दिलीप गांधी विजयी झाले होते. त्याच्या आधी 1999 मध्येही गांधी खासदार बनले होते. पण 2019 मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर सुजय विखे खासदार झाले.

पक्षफुटीनंतर या मतदारसंघात उमेदवार देण्याचे आव्हान शरद पवार यांच्यासमोर होते. पक्ष फुटीपूर्वी नीलेश लंके यांचे नाव चर्चेत होते. शरद पवार यांनी नीलेश लंके यांच्या घरी हजेरी लावून त्यावर शिक्कामोर्तब केले. परंतु पक्ष फुटल्यानंतर नीलेश लंके यांनी अजित पवार यांच्याकडे झुकते माप टाकले. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर लोकसभेसाठी चेहरा शोधण्याची वेळ आली.

लोकसभेच्या उमेदवारासाठी अनेक बैठक होत होत्या. त्यात शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांकडूनच नीलेश लंके यांचे नाव रेटण्यात येत होते. शरद पवार त्या नावावर चुप्पी साधत होते. वेळप्रसंगी कार्यकर्त्यांनी त्यांनी फटकारले देखील होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि कार्यकर्त्यांनी सर्व काही जमवून आणून नीलेश लंके यांना शरद पवार यांच्यासमोर उभं केले. यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील महत्त्वाची भूमिका ठरली.

नीलेश लंके देखील शरद पवार यांच्या विश्वासाला पात्र ठरले. नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक अपेक्षापेक्षा अटीतटीची झाली. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नीलेश लंके यांच्याबाजूने विजय खेचून आणला. नगर दक्षिणेतील विजयामुळे शरद पवार जाम खूश आहे.

Sharad Pawar Nilesh Lanke sangram jagtap
Ram Shinde Vs Sujay Vikhe : विखे-शिंदे दिलजमाईत 'मेख'च होती! शिंदेंची विखेंसाठी पळापळी 'फेक'च होती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com