Sameer Wankhede : मोठी बातमी : समीर वानखेडे यांची बदली रद्द; CAT चा महसूल विभागाला झटका

Sameer Wankhede : कॉर्डेलिया क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या समीर वानखेडे यांची चेन्नईला झालेली बदली 'कॅट'ने अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाने रद्द केली आहे.
IRS Sameer Wankhede
IRS Sameer WankhedeSarkarnama
Published on
Updated on

Sameer Wankhede news : कॉर्डेलिया क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या समीर वानखेडे यांची चेन्नईला झालेली बदली 'कॅट'ने अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाने रद्द केली आहे. यावेळी वानखेडे यांच्याविषयीची भूमिका पक्षपातीपणाची असल्याची टीकाही 'कॅट'ने केली. कॅटचे अध्यक्ष न्या. रणजित मोरे आणि सदस्य-अ राजिंदर कश्यप यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.

महसूल विभागाने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची मे 2022 मध्ये मुंबईहून चेन्नईला बदली केली होती. महसूल विभागाचा हा आदेश 'मनमानीपणाचा आणि स्वतःच्या विभागाच्या बदलीच्या धोरणाचा उल्लंघन करणारा असल्याचे न्यायाधीकरणाने म्हटले आहे.

IRS Sameer Wankhede
Anjali Damania News : दमानियांचा इशारा अन् फडणवीसांचा मेसेज; लगेच घेतली माघार, काय सांगितलं? 

बदलीपूर्वी वानखेडे मुंबईमध्ये (Mumbai) एनसीबीचे विभागीय संचालक होते. त्यावेळी कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापेमारी केली होती. या छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता.

IRS Sameer Wankhede
Maharashtra Budget 2025: संभाजी महाराजांसोबत तुलना करणं अनिल परबांना महागात पडणार; निलंबनासाठी सत्ताधारी आक्रमक

यामुळे वानखेडे यांना या प्रकरणाच्या चौकशीतून हटविण्यात आले होते. त्यानंतर 30 मे 2022 रोजी त्यांची चेन्नईला बदली करण्यात आली होती. पण आता हा बदली आदेश मनमानीपणाचा आणि स्वतःच्या विभागाच्या बदलीच्या धोरणाचा उल्लंघन करणारा असल्याचे न्यायाधीकरणाने म्हणत 'कॅट' बदली रद्द केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com