Anjali Damania News : दमानियांचा इशारा अन् फडणवीसांचा मेसेज; लगेच घेतली माघार, काय सांगितलं? 

Maharashtra CM Devendra Fadnavis MLA Suresh Dhas Assembly Session : अंजली दमानिया यांनी शुक्रवारी विधानभवनाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
Anjali Damania, Devendra Fadnavis
Anjali Damania, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbia News : संतोष देशमुख हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला होता. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आवाज उठवला होता. आता भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याविरोधातही त्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांचा कार्यकर्ता असलेल्या सतिश भोसलेच्या कृत्यानंतर त्यांनी विधानभवनाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता.

दमानिया या शुक्रवारी विधानसभाबाहेर ठिय्या आंदोलन करणार होत्या. मात्र, आता त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. त्यांनीच एक्सवर याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेसेज आल्याचे सांगितले आहे. दमानिया यांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांना एक मेसेज केला होता. त्याला उत्तर आल्यानंतर आंदोलन मागे घेतले आहे.

Anjali Damania, Devendra Fadnavis
Satish Bhosale attack case : सतीश भोसले ऊर्फ खोक्याच्या 'आका'वर कारवाई करा; 24 तासात दुसरा गुन्हा, आरोपी पसार

सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी मेसेज करून विचारणा केली की महाराष्ट्रात (मुख्यतः बीडमध्ये) चाललेल्या ह्या दहशतीवर, मुख्यमंत्र्यांनी युतीतल्या आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना, आता तरी, समज देण्याची गरज आहे, आणि त्यांनी तशी समाज अधिवेशनात द्यावी, नाहीतर आम्हाला अधिवेशनाच्या ठिकाणी उद्या आंदोलन करावे लागेल असे सांगितले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

बहुदा त्यांनाही तसेच वाटत असावे, म्हणून त्यांनी “उद्या नाही पण ह्याच अधिवेशनात करतो” असे उत्तर दिले. म्हणून उद्या मी ह्या विषयावर आंदोलन करणार नाही, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. दमानिया यांच्या दाव्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडून अधिवेशनात सर्वच आमदारांना समज दिली जाऊ शकते. यावेळी ते नेमके कुणाचे नाव घेणार, काय बोलणार, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.

Anjali Damania, Devendra Fadnavis
Opposition leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी आंध्र प्रदेशाप्रमाणेच राज्यातील परिस्थिती; चार दशकापूर्वीचा इतिहास काय सांगतो?

दरम्यान, धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. दमानिया यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी धस यांच्याविरोधातही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com