Video Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारचा दणका

Pooja Khedkar dismissed from administrative service : अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्राद्वारे यूपीएससीतून पूजा खेडकरने IAS केडर मिळवले होते.
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pooja Khedkar News : अपंगत्वाच्य बनावट प्रमाणपत्राद्वारे यूपीएससीतून IAS केडर मिळवणाऱ्या पूजा खेडकरला केंद्र सरकाने मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.

दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले होते. 26 सप्टेंबरला पूजाच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार होती.

दोन दिवसांपूर्वी पूजाला न्यायालयाने दिलासा दिला असला तरी केंद्र सरकारने मात्र कारवाई करत पूजाला बडतर्फ केले. दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत पूजाने IAS केडर मिळवले होते. तसेच नावात बदल करून तिने अनेकदा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप देखील पूजावर आहे.

Pooja Khedkar
Samarjitsingh Ghatge : शरद पवारांच्या शिलेदाराने घेतली राजू शेट्टींची भेट, राज्यात नवीन राजकीय समीकरण?

पूजाच्या विरोधात यूपीएससीकडून दिल्लीतील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना पूजा यांनी आपल्या खासगी गाडीला अंबर दिवा लावल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याच्या चेंबरचा ताबा देखील पूजा यांनी घेतला होता.

पूजा यांच्या विषयी राज्य सरकारकडे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर पूजा यांच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले होते. पूजा यांच्या आईने देखील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकल्याचे प्रकरण समोर आले होते.

Pooja Khedkar
Congress News : राजकीय आखाड्यातील बजरंग, विनेशच्या नव्या डावाने भाजप हैराण; काँग्रेसमध्ये नवचैतन्य !

तारीख पे तारीख

पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी ऑगस्ट महिन्यापासून दिल्ली सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, ही सुनावणीची तारीख तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आत्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तो पर्यंत न्यायालयाने पूजाला अटकेपासून संरक्षण दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com