Maharashtra Drought News : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी: दुष्काळी मदतीचे दर, निकष बदलण्याचे संकेत; लवकरच वाढीव दरानं नुकसान भरपाई..?

Dry Drought: केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर एनडीआरएफच्या निकषांनुलार मिळणाऱ्या मदतीच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा लाभजिरायती, बागायती आणि बहुवार्षिक पिकांच्या शेतकऱ्यांना होणार आहे.
Drought News
Drought News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

कृष्णा लोखंडे

Maharashtra News: अपुरा पाऊस व प्रदीर्घ खंड, यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीच्या दरांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची प्रतीक्षा आहे.

केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर एनडीआरएफच्या निकषांनुलार मिळणाऱ्या मदतीच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा लाभजिरायती, बागायती आणि बहुवार्षिक पिकांच्या शेतकऱ्यांना होणार आहे. 'अल निनो'च्या प्रभावाचा फटका शेतपिकांना बसला आहे. हाती येऊ घातलेली पिके गेली असून, नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर आहे. सोयाबीनच्या आतापर्यंत झालेल्या कापणी प्रयोगात एकरी दोन क्विंटलची (हेक्टरी पाच क्विंटल) सरासरी आली आहे. तूर करपू लागली असून, कापूसही हातचा जाऊ लागला आहे. एकंदरीत खरीप हंगामातील मुख्य पिकांचे नुकसान पाहता यंदा शेतकऱ्यांचे अर्थचक्र अडचणीत आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापोटी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत करण्यात येते. यामध्ये केंद्राचा ७५, तर राज्याचा २५ टक्के वाटा असतो. मदतीसाठीचे निकष केंद्राने निश्चित करून दिले आहेत. यंदाची दुष्काळी स्थिती पाहता शेतकऱ्यांकडून वाढीव मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, त्यासाठी दबावही वाढला आहे. केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी नुकसानीची व्यथा मांडतानाच भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मदतीसंदर्भातील आदेश राज्य सरकारने अद्याप काढलेला नाही. त्यामुळे नेमकी किती मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडणार, है अनिश्चित आहे. केंद्राकडून मदतीचे दर जाहीर झाल्यानंतर हा आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Drought News
Amit Shah News: संयम संपला..! अमित शहांचा राहुल गांधींसह विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीला मोठा इशारा, '2029 मध्ये त्यांनी मोठ्या पराभवाला...'

सध्याच्या स्थितीत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी १७हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत दोन हेक्टरच्या मयदित देण्यात येते.

यंदाच्या दुष्काळाने शेतकन्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. सरासरी उत्पादन पाहता लागवडीचा खर्च निघणेही दुरापास्त झाल्याने किमान मदतीचे दर वाढवून देण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गासह सर्व स्तरांतून करण्यात येऊ लागली आहे.

Drought News
Pradeep Purnekar News: प्रदीप पूर्णेकर हत्याकांड: शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर आरोपांचे शिंतोडे, एकनाथ शिंदे दोन आठवड्यानंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

केंद्रीय पथकाचा संभाव्य अहवाल व मागणीची तीव्रता पाहता या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५००, बागायतीसाठी २३ हजार, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

यंदाची दुष्काळी स्थिती पाहता शेतकऱ्यांचे अर्थचक्र पूर्णतः विस्कळीत झाले आहे. उत्पादनाची सरासरी पाहता त्यासाठी केलेला खर्चही निघणे कठीण आहे. नुकसानभरपाईचे दर त्यासाठी बदलण्याची गरज आहे. वाढीत दराने मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकणार आहे - सुधीर इंगळे, शेती अभ्यासक

पिकांचा प्रकार - मदतीचे विद्यमान दर (प्रतिहेक्टर) - नवीन मिळू शकणारे दर (प्रतिहेक्टर)

जिरायती - ८,५०० रुपये - १३ हजार ५०० रुपये

बागायती - १७,००० रुपये - २३ हजार रुपये

बहुवार्षिक - २२,५०० रुपये - २५ हजार रुपये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com