Shivaji Patil News : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. कोल्हापूरमधील चंदगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार होता मात्र भाजपचे बंडखोर अपक्ष आमदार शिवाजी पाटील हे विजयी झाले. या विजयानंतर पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पायापडून गळाभेट घेतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमदार शिवाजी पाटील व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गोवा विमानतळवर भेट झाली. त्यामुळे आमदार पाटील यांनी सावंत यांच्या पायापडत गळाभेट घेतली. सावंत यांनी पाटलांना पुष्पगुच्छ देऊन विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
शिवाजी पाटील हे भाजपकडून विधानसभा लढण्यास इच्छूक होते. मात्र, हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे बंडखोरी करत शिवाजी पाटील यांनी विजय खेचून आणला. 24 हजाराहून अधिकचे मताधिक्याने त्यांनी मिळवले होते.
उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सावंत आणि पाटील यांची भेट झाली. भेटीचा व्हिडिओ शिवाजी पाटील यांनी फेसबुक अकाऊंवरुन शेअर केला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी लागेल ती मदत करायला मी सदैव तत्पर आहे, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले, असे शिवाजी पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
अपक्ष म्हणून विजयी झालेले शिवाजी पाटील यांनी आपल्या विजयानंतर थेट देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत त्यांचा सत्कार केला. तसेच आपल्या पाठींब्याचे पत्र दिले. त्यामुळे पाटील हे अपक्ष असले तरी ते भाजपसोबत राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.