Chandrahar Patil News : '...तर मी विशाल पाटलांच्या मागे उभा राहणार'; सांगलीसाठी इच्छुक असलेल्या चंद्रहार पाटलांचे मोठे विधान

Political News : शिवसेनेने त्यांचा कोल्हापूर हा हक्काचा मतदारसंघ काँग्रेसला सोडला आहे. त्या बदल्यात शिवसेनेने सांगली मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगली लोकसभा कोणाला सोडला जाणार याकडे लक्ष लागले आहे.
vishal patil, chandrahar patil
vishal patil, chandrahar patil sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वांचे लक्ष सांगली लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. या मतदार संघासाठी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात मोठी चुरस आहे. शिवसेनेने त्यांचा कोल्हापूर हा हक्काचा मतदारसंघ काँग्रेसला सोडला आहे. त्या बदल्यात शिवसेनेने सांगली मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगली लोकसभा कोणाला सोडला जाणार याकडे लक्ष लागले आहे.

सांगली मतदारसंघावरून काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच आहे. महाविकास आघाडीत सांगली लोकसभा संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मातोश्रीवरून मला उमेदवारीचा शब्द देण्यात आला आहे, त्यामुळे मी निवडणुकीच्या तयारीत असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितले. (Chandrahar Patil News)

vishal patil, chandrahar patil
Loksabha Election 2024 : काँग्रेस महाराष्ट्रात 18 जागा लढणार, दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब?

याबाबत चंद्रहार पाटील म्हणाले की, मला उमेदवारी मिळाली, तर विशाल पाटील यांनी माझ्या माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाल्यास मी त्यांच्या मागे उभा राहीन, असेही चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले.

सांगलीमधील मिरजेत गुरुवारी उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना चंद्रहार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्याच्या सभेमधून जे काय चित्र असेल ते स्पष्ट होईल मला उमेदवारी मिळेल, अशी आशा असल्याचे यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंची उद्या मिरजेमध्ये जाहीर सभा होत असून यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब करणार का? याची उत्सुकता आहे. चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर उमेदवारीचा शब्द आल्याने काँग्रेसमध्ये सन्नाटा पसरला आहे. काँग्रेसने सांगली जागेवर दावा करतानाच जागा आपलीच असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडून काँग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा आहे.

विश्वजीत कदम यांची आक्रमक भूमिका

आमदार विश्वजीत कदम (Vishvjeet Kadam)यांनी सांगलीसाठी रान पेटवले आहे. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सांगलीत आज 600 गावे असून यामधील 10 टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का? कोणत्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही, अशी भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली आहे.

vishal patil, chandrahar patil
Chandrahar Patil Join Shivsena UBT : 'अब की बार चंद्रहार!' सांगलीसाठी ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी पाटील उमेदवार

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com