Pune News : बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. देशमुख यांच्या गुन्हेगारांसोबतच या गुन्ह्या मागचा मास्टरमाईंड शोधावा, अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबाकडून करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणाचा हस्तक्षेप विरहीत तपास व्हावा यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामेची मागणी देखील सातत्याने करण्यात येत आहे.
नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केले आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 पासून महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. सरकार गेलं तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. नंतर सरकार आल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले आणि आता मोठ्या बहुमतासह ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. या सगळ्या काळातील अनुभव असा आहे की ते काही विषय निष्कर्ष पर्यंत येत नाही तोपर्यंत निर्णय घेत नाहीत. मात्र निष्कर्ष आल्यानंतर ते कुणाला सोडत देखील नाहीत.
धनंजय मुंडे हे दोषी असतील तर त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस हे कारवाई करतील, असे संकेतच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
वाल्मिक कराड याने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, एसआयटी आपलं काम करत आहे. सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
या तपासाच्या माध्यमातूनच आतापर्यंत आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये कोणालाही सोडणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते त्या पद्धतीनेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपाच्या शिर्डी येथे झालेल्या अधिवेशना दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थनच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्ट निकाल आला की निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. येत्या 22 जानेवारीला कोर्टाचा काय निकाल येतो त्यावरती पुढील परिस्थिती अवलंबून असणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे शहरांमध्ये आणि लगत असलेल्या टेकड्या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. म्हातोबा टेकडीवर तीन आगीच्या घटना घडल्या. त्यात अडीच हजार झाडाचं नुकसान झालं आहे. काही उपद्रवी लोकांमुळे या आगीच्या घटना घडत असल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे आज बैठकीत सीसीटीव्ही लावणे,गार्ड नेमणे,ग्राउंड वर टॉवर उभे करणे,गवत साचून न देणे,मशीन साह्याने ते काढणे आणि तिकडेच विल्हेवाट लावणे याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.