Uddhav Thackeray, Harshvardhan Sapkal
Uddhav Thackeray, Harshvardhan Sapkal Sarkarnama

MVA tension : महाविकास आघाडीत भूकंप! चंद्रपूरच्या 'त्या' युतीचा हिशोब उद्या मातोश्रीवर; स्थानिक नेत्यांच्या मनमानीवर उद्धव ठाकरे घेणार कडक अ‍ॅक्शन!

Political News : मुंबईतील महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेसोबत युती केल्याने काँग्रेसने त्यांची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढवली होती.
Published on

Chandrapur News : चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापन होऊन आता पाच दिवस उलटले आहेत. त्यांनतरही या ठिकाणी झालेल्या अभद्र युतीची चर्चा जोरात रंगली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईतील महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेसोबत युती केल्याने काँग्रेसने त्यांची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ऑक्सिजनवर होती. मात्र, आता चंद्र्पुरात काँग्रेसला पाठींबा ने देता ऐनवेळी भाजपसोबत ठाकरेंची शिवसेना गेल्याने काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे.

त्यातच आता याबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांना बगल देत चंद्रपूर पालिकेतील सत्तारूढ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्याना सोमवारी मुंबई येथील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावले आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे त्यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपुरातील महानगरपालिकेत सत्ता स्थापन करीत असताना शिवसेनेने आघाडी धर्म पाळला नाही, असा थेट आरोप काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या युतीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपले हात झटकले आहेत. हा पक्षाचा किंवा उद्धव ठाकरे यांचा निर्णय नाही. हा सर्व प्रकार स्थानिक नेत्यांनी केला असून त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल, असे सांगत संजय राऊत यांनी आपण युतीचे समर्थन करत नसल्याचे जाहीर केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.

दरम्यान, तुमचेच नेते आपसात भांडत होते. प्रदेशाध्यक्षांनी दिलेला फॉर्म्युलादेखील काँग्रेस नेते मान्य करायला तयार नव्हते. हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारे नगरसेवकांचे संख्याबळ गोळा करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच होती. मात्र, शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये एकमत नव्हते, असे सांगून त्यांनी या स्थितीसाठी काँग्रेसलाच जबाबदार धरले. तत्पूर्वी, चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरे सेनेने दगा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले होते. याचे परिणाम उद्धव सेनेला भोगावे लागतील.

दरम्यान, चंद्रपूरमधील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांसोबत पक्षातील एक वेगळाच नेता वाटाघाटी करत होता. आ. वरुण सरदेसाई हे नगरसेवकांच्या संपर्कात होते, असे आता समोर आले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून, हा सर्व प्रकार उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्याचे सांगितले जाते.

सोमवारी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर पालिकेतील सत्तारूढ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्या बोलावले आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे त्यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com