Rajya Sabha Election : भुजबळांना उमेदवारी नाकारल्याने राष्ट्र्वादीत नाराजीनाट्य! मनधरणीसाठी प्रफुल पटेलांनी पडद्यामागून नेमकी कोणती चावी फिरवली?

Chhagan Bhujbal News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी मंत्री छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसापासून इच्छुक आहेत.
prafull patel, sunetra pawar,chhagan bhujbal
prafull patel, sunetra pawar,chhagan bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी मंत्री छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसापासून इच्छुक आहेत. दोन वर्षांपूर्वी सुनेत्रा पवार या राज्यसभेवर जाण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी इच्छा प्रदर्शित केली होती. त्यानंतर आताही राज्यसभेवर जाण्यासाठी तयारी दर्शवली होती. मात्र, त्यासाठी घातलेली अटच त्यांच्यासाठी अडसर ठरली. शनिवारी रात्री उशिराच भाजप हायकमांडकडून आलेला निरोप फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने भुजबळ राज्यसभेवर जाणार नाहीत हे जवळपास फायनल झाले होते.

रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यामध्ये भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भुजबळ त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने राज्यसभेसाठी यावेळी बैठकीत इच्छुक असलेल्या विजयसिंह पंडित, राजेंद्र जैन यांना बोलाविण्यात आले. त्यानंतर जैन यांना उमेदवारी देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जाहीर करताना भुजबळ यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती.

prafull patel, sunetra pawar,chhagan bhujbal
NCP Rajyasabha News: राष्ट्रवादीकडून भुजबळांची उमेदवारी फायनल नाहीच..? सुनेत्रा पवारांच्या नव्या दाव्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होत असलेल्या जागेवर वर्णी लागावी यासाठी मंत्री भुजबळ यांच्यासह भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा देखील इच्छुक होत्या. त्यासोबतच उमेदवारीसाठी प्रमोद हिंदुराव, अविनाश आदिक, समीर भुजबळ, राजेंद्र जैन व विजयसिंह पंडित यांची नाव चर्चेत होती. यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. यादरम्यानच त्यांनी राज्यसभेसाठी इच्छा दर्शवतानाच एक अटही ठेवली. आपले मंत्रीपद समीर भुजबळांना देण्यात यावे, ही त्यांची अट होती. मात्र, भाजप हायकमांडकडून आलेला निरोप सीएम फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने भुजबळ राज्यसभेवर जाणार नाहीत हे जवळपास फायनल झाले होते.

prafull patel, sunetra pawar,chhagan bhujbal
Rajya Sabha candidate : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी; राज्यसभेचा उमेदवार होणार फायनल, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार करणार नावाची घोषणा?

या बैठकीत भुजबळांना धक्का देत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर केली. हा भुजबळांना मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जाते. त्यानंतर मंत्री भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे सोमवारी सकाळी राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भुजबळ उपस्थित राहणार की नाही ? याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

prafull patel, sunetra pawar,chhagan bhujbal
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, राज्यसभा उमेदवारीबाबत सस्पेन्स संपणार; कोअर कमिटीच्या बैठकीत भुजबळांसह 'ही' चार नावे चर्चेत

मात्र, सोमवारी सकाळीच प्रफुल पटेल यांनी भुजबळ यांची नाराजी दूर करण्याची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. यावेळी समजूत काढण्यासाठी पटेल स्वतःच भुजबळांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी पटेल व भुजबळ यांच्यात जवळपास ३० मिनिटापेक्षा अधिककाळ चर्चा देखील झाली. यादरम्यान चर्चावेळी भुजबळ यांनी त्यांच्याकडे या सर्व प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद देखील यावेळी पटेल यांना बोलून दाखवली.

prafull patel, sunetra pawar,chhagan bhujbal
Rajya Sabha Election : छगन भुजबळांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; 'त्या' अटीमुळे वाढली अडचण, 24 तासानंतरही निर्णय होईना !

त्यावेळी भुजबळ यांनी राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांच्या घरी दोन-दोन पदे आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाच्या जडणघडणीत माझा मोठा वाटा आहे. त्यामुळे मलाही हा नियम लागू करण्याची विनंती भुजबळ यांनी पटेलाकडे व्यक्त केली, असल्याचे समजते. त्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून पटेल यांनी वरिष्ठापर्यंत त्यांचे मत पोहचवून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले असल्याचे समजते. त्यानंतर भुजबळ यांची नाराजी दूर झाली.

prafull patel, sunetra pawar,chhagan bhujbal
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, राज्यसभा उमेदवारीबाबत सस्पेन्स संपणार; कोअर कमिटीच्या बैठकीत भुजबळांसह 'ही' चार नावे चर्चेत

त्यानंतर काही वेळातच राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ यांना सोबतच आणले होते. भुजबळ गाडीतून उतरताच राजेंद्र जैन यांनी खाली वाकून नमस्कार केला. त्यामुळे भुजबळ यांची नाराजी दूर झाली असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीमधील नेत्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराज असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

prafull patel, sunetra pawar,chhagan bhujbal
NCP Rajyasabha News: राष्ट्रवादीकडून भुजबळांची उमेदवारी फायनल नाहीच..? सुनेत्रा पवारांच्या नव्या दाव्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com