Video Sanjay Shirsat : छगन भुजबळ-शरद पवार यांच्या भेटीवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'पाॅझिटिव्ह साइन...'

Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting Sanjay Shirsat :अधिवेशनाच्या काळात आरक्षणाच्या संदर्भात बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते आले नाही. त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊन छगन भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले, असे संजय शिरसाट म्हणाले.
Chhagan Bhujbal | Sharad Pawar
Chhagan Bhujbal | Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Shirsat News : मंत्री छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने महाराष्ट्राचे राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, भुजबळ यांनी स्वतः स्पष्टीकरण देत ही राजकीय भेट नव्हती. आरक्षणच्या प्रश्ना संदर्भात भेट घेतल्याचे सांगितले. भुजबळ-पवार यांच्या भेटीवर शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'अधिवेशनाच्या काळात आरक्षणाच्या संदर्भात बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते आले नाही. त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊन छगन भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले. शरद पवार साहेबांनी देखील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी बोलतो,असे सांगितले आहे. त्यामुळे याकडे आपण पाॅझिटिव्ह साइन म्हणून पाहायला पाहिजे.', असे संजय शिरसाट म्हणाले.

ज्यांना आवश्यकता आहे. त्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. म्हणून सरकारने कुणबी नोंदी शोधून काढल्या. मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात सांगितले की कुणबी नोंदीमुळे दीड कोटी मराठ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे आता ओबीसींच्या मागण्या असतील. इतर कोणाच्या मागण्या असतील तर विरोधकांना न डावलता सर्वांशी चर्चा करून यातून मार्ग काढू. चर्चेतून प्रश्न सुटतात, असे संजय शिरसाट म्हणाले.

Chhagan Bhujbal | Sharad Pawar
Bhujbal Meet Pawar : साथ सोडली तरी भुजबळांचा आजही पवारसाहेबांवर लईच भरोसा

मुख्यमंत्री शिंदे-शरद पवार बैठक

शरद पवार यांच्या भेटीवरून जी चर्चा सुरू होती. त्यावर स्वतः छगन भुजबळ यांनी पडदा टाकला आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो.तसेच शरद पवारांनी निरोप पाठवला तर दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची दोन दिवसांत बैठक होईल, असे संजय शिरसाट म्हणाले

Chhagan Bhujbal | Sharad Pawar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांनी 'यूपीएससी'ला देखील गंडवले; नावात बदल, 11 वेळा परीक्षा दिली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com