PM Narendra Modi : पुतळा कोसळल्याप्रकरणी नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी

PM narendra modi first reaction on chhatrapati shivaji maharaj statue collapsed in rajkot fort : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. पाहा नेमकं काय म्हणाले?
Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी फक्त नाव नाही. ते आमचे आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गात जे झाले त्यासाठी मान झुकवून शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोके ठेवून माफी मागतो', असे नरेंद्र मोदी म्हणाले.

वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पालघरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.

मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्यावर्षी झाले होते. मात्र अवघ्या आठ महिन्यातच हे पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यावर काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.

Narendra Modi
Revanth Reddy : सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा माफीनामा; 'डील' प्रकरण आले अंगलट...

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली. मोदी म्हणाले, भारताचे महानसुपुत्र वीर सावरकर यांना शिव्या दिल्या जातात. ते माफी मागत नाहीत. त्यांची कोर्टात जायची तयारी असते. मात्र, आमचे संस्कार वेगळे आहेत.

शिवाजी महाराजांच्या चरणाव डोकं ठेवून माफी मागतो. जे लोक शिवाजी महाराजांना आराध्य दैवत त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवताची पूजा करणारांची माफी मागतो. आमच्यासाठी आराध्य दैवतेपेक्षा काहीही मोठे नाही, असे मोदी म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी मागितली माफी

शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारने या प्रकरणी पुतळ्या बनवणाऱ्या गुन्हा दाखल केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी माफी मागितली. अजित पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली.

Narendra Modi
Radhakrishna Vikhe Vs Nilesh Lanke : मंत्री विखेंच्या दिशाभूल राजकारणचं खासदार लंकेंनी सर्वच काढलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com