Revanth Reddy : सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा माफीनामा; 'डील' प्रकरण आले अंगलट...

Supreme Court K Kavitha Bail : सुप्रीम कोर्टाने के. कविता यांना जामीन दिल्यानंतर रेवंथ रेड्डी यांनी त्यावर वादग्रस्त भाष्य केले होते.
Revanth Reddy, Supreme Court
Revanth Reddy, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना सुप्रीम कोर्टाची माफी मागावी लागली आहे. कोर्टाने गुरुवारी रेड्डींना फैलावर घेत जबाबदारीची जाणीव करून दिली होती. त्यांनी त्यांनी बिनशर्त माफी मागत आपण भारतीय न्यायव्यवस्थेचा सन्मान करत असल्याचे सांगितले. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने नुकताच के. कविता यांना जामीन मंजूर केला आहे. त्यावर रेड्डी म्हणाले होते की, बीआरएसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी मदत केली, हे सत्य आहे. अशीही चर्चा आहे की, के. कविता यांना बीआरएस आणि बीजेपीमधील ‘डील’मुळे जामीन मिळाला आहे.

Revanth Reddy, Supreme Court
Hemant Soren : हेमंत सोरेन यांनी हुकमी एक्का काढला बाहेर! चंपई सोरेन यांच्या भाजप प्रवेशआधीच मोठी खेळी

रेड्डी यांच्या या विधानाचा कोर्टाने गुरूवारी समाचार घेतला होता. अशाप्रकारची विधाने लोकांच्या मनात साशंकता निर्माण करू शकतात. आम्ही राजकीय पक्षांच्या सल्ल्याने आदेश देतो का, असा सवाल कोर्टाने केला होता. न्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, एक जबाबदार मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारचे विधान करणे योग्य नाही.

राजकीय लढाईत कोर्टाला का ओढले जात आहे? आमच्या आदेशांवर कुणी टीका करत असेल तर आम्हाला फरक पडत नाही. आम्ही विवेक आणि शपथेनुसारच आपले कर्तव्य पार पाडतो. संस्थांविषयी सन्मान दाखविणे हे राजकीय पक्षांचे नैतिक कर्तव्य असल्याचेही कोर्ट म्हणाले होते.

Revanth Reddy, Supreme Court
Narendra Modi : सरस्वती बुध्दी वाटत असताना ते सर्वात पुढे होते! पंतप्रधान मोदी कुणाला म्हणाले विद्वान?

रेड्डींचा माफीनामा

कोर्टाने फटकारल्यानंतर रेड्डी यांनी शुक्रवारी ‘एक्स’वर पोस्ट करत माफी मागितली. माझ्या विधानांबाबत बातम्यांमध्ये प्रसिध्द झालेला संदर्भ चुकीचा दावा करताना रेड्डी म्हणाले, न्यायपालिका आणि त्याचे स्वातंत्र्य याविषयी आपल्या मनात सन्मान आणि सर्वोच्च आदर आहे. भारताचे संविधान आणि त्यावर दृढ विश्वास असलेल्या न्यायपालिकेचा मी सर्वोच्च सन्मान करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com