Vijay Wadettiwar : 'लाडक्या बहिणी'साठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं मोठं पाऊल; ...म्हणून सरकारविरोधात थेट हक्कभंग आणणार!

Vijay Wadettiwar and Shambhuraj Desai clash on Ladki Bahin Yojana Ordinance : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन लाडकी बहीण योजनेचा अध्यादेश काढला. सरकारचा हा प्रकार म्हणजे सार्वभौम सदनाचा अपमान आहे, असा आक्षेप घेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Vijay Wadettiwar Vs Shambhuraj Desai : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेचा सरकारने घाईघाईने आणलेल्या अध्यादेशावर संताप व्यक्त केला. 'लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अध्यादेश काढला. हा प्रकार म्हणजे, सार्वभौम सदनाचा सरकारने केलेला अपमान आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सदनात संपूर्ण चर्चा गरजेची होती. तशी आमची मागणी आहे. मात्र सरकारने श्रेयासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन योजनेचा परस्पर अध्यादेश काढला. सरकारची ही कृती सदनाचा अपमान करणारी आहे. सरकारच्या या कृतीविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. मंत्री शंभुराज देसाई यांनी यावर विजय वडेट्टीवार यांना जशास तसे उत्तर दिले आहे. चांगल्या निर्णयावर विरोधकांचे पोटसूळ उठतेच, असा घाणाघात मंत्री देसाई यांनी केला.

राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेची घोषणा काल झाली आणि त्याच्या अंमलबजावणीचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काढला. सरकारचा हा प्रकार म्हणजे सार्वभौम सदनाचा अपमान आहे, असा आक्षेप घेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विजय वडेट्टीवार यांनी हक्कभंगाची भाषा वापरून घेरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्यावर एकटे पडलेले असतानाच त्यांच्या मदतीला मंत्री शंभुराज देसाई उभे राहिले.

Vijay Wadettiwar
Mahayuti Political News : मुख्यमंत्री कोण ? महाविकास आघाडीचाच 'तो' फॉर्म्युला महायुती फॉलो करणार ? अजितदादांचा नेता म्हणाला...

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले आहे की, विधिमंडळाला अर्थसंकल्प मंजुरीचा अधिकार आहे. त्यावरील विनियोजन विधेयकाला मंजुरी राज्यपालांकडून मिळते. अर्थसंकल्पातील निधी खर्चास मान्यता मिळून तसा सरकारी अध्यादेश निघतो. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सर्व प्रक्रिया डावलून मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या मान्यतेचा सरकारी आदेश काढला. हा सार्वभौम सदनाचा हक्कभंग आहे.

Vijay Wadettiwar
Mumbai North Lok Sabha Election : दोन उमेदवारांच्या पोलिंग एजंटचे ओळखपत्र रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे? अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

मंत्री शंभुराज देसाई यांनी विजय वडेट्टीवार यांच्या हक्कभंग भाषेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मंत्रिमंडळात जेव्हा एखाद्या निर्णयाला मान्यता दिली जाते, तेव्हा त्या निर्णयाचा सरकारकडून लगेच अध्यादेश काढला जातो. सरकारला स्वतंत्र निर्णयाचा अधिकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले निर्णय घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यांना चांगले निर्णय बघवत नाही. विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळात कधीच चांगले निर्णय घेतले नाही. आमच्या सरकारच्या काळात होत असलेले चांगले निर्णय पाहून पोटसूळ उठत आहे. त्यामुळे वाटेल, तसे बोलत सुटले, असा घाणाघात शंभुराज देसाई यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com