Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एन्ट्री; बेळगावसह 'या' भागात...

Karnataka Assembly Election 2023 : महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Karnataka Election 2023: कर्नाटकच्या विधानसभेसाठी येत्या १० मे ला मतदान होणार आहे. तसेच 13 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपसह काँग्रेसनेही कर्नाटक निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने तर कर्नाटक निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला असून प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची फौज मैदानात विजयासाठी मोठी कंबर कसली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस बाकी राहिले असतानाच आता प्रचारात भाजपसह एनडीएतील घटक पक्ष असलेल्या वरिष्ठ नेतेमंडळींना उतरवलं आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचाराला (Karnataka Election) जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री आपल्या टीमसह कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बेळगावसह अन्य सीमाभागातही ते प्रचार करतील, अशी माहिती समोर येत आहे

Eknath Shinde
Sharad Pawar News : पवारांनी मोदींना फोन केल्यानेच २०१४ मध्ये माझा पराभव ; जानकरांचा आरोप

महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे. भाजप(BJP)ने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपने महाराष्ट्रातील सहा जणांची एक यादी तयार केली आहे.

महाराष्ट्रातील हे भाजप नेते प्रचाराला जाणार

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve), केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं असून केंद्रीय नेतृत्वाने स्वतः या ठिकाणी लक्ष घातल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बीएस येडियुराप्पा यांनी नुकतंच सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.

Eknath Shinde
Prithviraj Chavan on Karnatak Election: राष्ट्रवादीमुळे भाजपला फायदा होणार? पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक वक्तव्य

काँग्रेस पूर्ण ताकदीनं मैदानात

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस(Congress) पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे. राहुल गांधी कर्नाटकमध्ये तळ ठोकून आहेत. मतदानपूर्व चाचण्यांमध्ये काँग्रेसला कल दाखवण्यात आला आहे. त्यामुळं काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेसनं कर्नाटक विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. राजस्थानच्या आमदार दिव्या मदेरणा यांना देखील स्टार प्रचारक करण्यात आलं आहे.

Eknath Shinde
Ramdas Kadam On Thackeray: ''ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून गुळाचा गणपती बसवला...''; शिंदे गटाच्या नेत्याचा खोचक टोला

काँग्रेस जेडीएसचं कडवं आव्हान...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या २२४ इतकी आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे ११३ आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे. कर्नाटकमध्ये सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेस आणि जेडीएस यांनी कडवं आव्हान उभं केलं आहे.कर्नाटकमध्ये बडे नेते प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. कर्नाटकसाठी एका टप्प्यात मतदान पार पडणार असून १३ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. कर्नाटकच्या जनतेचा कौल कुणाला मिळणार हे त्या दिवशी स्पष्ट होईल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com