Ambadas Danve On Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री अन् त्यांच्या पक्षाला पन्नास वर्षापूर्वी इहलोक सोडून गेलेल्या नेहरूंचा आधार बचावासाठी का घ्यावा लागतो?

A discussion on why Chief Minister Fadnavis and his party need to rely on the support of Pandit Nehru for defense. : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोयीसाठी नेहरू वापरावेत हाच आपला कावा. कोरटकर अंगलट आल्याने तुम्ही पुढे केलात छावा.
Pandit Nehru-Devendra Fadnavis-Ambadas Danve News
Pandit Nehru-Devendra Fadnavis-Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी आज सभागृहात लावून धरली. तसेच औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कोरटकरचा मोबाईल पोलीस जप्त करतात मात्र तो कसा सापडत नाही? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. विरोधक आक्रमक झाल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या बचावासाठी मैदानात उतरले.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी आॅफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय लिहले? याचा निषेध करण्याची हिंमत तुम्ही दाखवणार आहात का? अशा शब्दात विरोधकांना फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड यांची अफझल खानाचा बलाढ्य आणि शिवाजी महाराज पाच फुटांचे होते, असा रेकाॅर्डवर उल्लेख केला. त्यावर तुम्ही बोलणार नाही. सलेक्टिव्ह बोलू नका, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना धारेवर धरले.

यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपकडून वारंवार बचावासाठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना ओढले जाते, अशी टीका दानवे यांनी केली. या संदर्भात 'एक्स'वर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांना डिवचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोयीसाठी नेहरू वापरावेत हाच आपला कावा.

Pandit Nehru-Devendra Fadnavis-Ambadas Danve News
Ambadas Danve On Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, आता कोकाटेंचा नंबर! अंबादास दानवेंचा इशारा

कोरटकर अंगलट आल्याने तुम्ही पुढे केलात छावा,असे म्हणत पन्नासवर्षांपूर्वी जो माणूस इहलोक सोडून गेला, त्याचा आधार घेऊन स्वतःचा बचाव आजही आपल्याला आणि आपल्या पक्षाला का करावा लागतो? याचे आत्मपरीक्षण करा एकदा, असा टोला अंबादास दानवे यांनी फडणवीस आणि भाजपला लगावला.

Pandit Nehru-Devendra Fadnavis-Ambadas Danve News
Devendra Fadnavis: '..अरे आहे का हिम्मत?', फडणवीसांनी झोडून काढलं

एवढेच नाही, तर प्रतापगडावर पंडित नेहरू यांनी केलेले भाषण आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना आपल्यासाठी खास देतो,एकादा ऐका, असा चिमटाही काढला. एकूणच विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमधील खडाजंगी आणि छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब, अफझल खान, छावा चित्रपटाच्या उल्लेखानेच गाजला.

Pandit Nehru-Devendra Fadnavis-Ambadas Danve News
Aditya Thackeray vs Gulabrao Patil : ...अन् भरसभेत दोघांमध्ये खडाजंगी, नेमकं काय घडलं?

सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच विधान भवनाच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात निदर्शने केली. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com