Shivsena Maharashtra News : मुख्यमंत्री शिंदे `लढ` म्हणाले; खासदारांचा जीव भांड्यात...

CM Shinde News : सर्व १३ खासदार असलेल्या मतदारसंघात आपणच लढणार आहोत, याशिवाय ठाकरे गटाकडे असलेल्या ९ मतदारसंघांतही आपणच लढणार.
Shivsena Maharashtra News
Shivsena Maharashtra News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने तयारीही सुरू केली. परंतु राज्याच्या सत्तेत फ्रंट सीटवर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाच्या काहीच हालचाली दिसत नव्हत्या. (Shivsena News) शिंदे यांनी उठाव केला तेव्हा त्यांच्यासोबत १३ खासदार आले होते. त्यांच्या मतदारसंघांचे काय? त्यांना उमेदवारी मिळणार का? या सगळ्या प्रश्नांवर या खासदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

Shivsena Maharashtra News
Shivsena UBT News : शिबिरासाठी स्वतःच्या खिशातून औषधी खरेदी करा, सरकारी लूट कशाला ?

विद्यमान खासदारांच्या मतदारसंघात भाजपने स्वतंत्र तयारी सुरू केल्याने अनेकांनी धसका घेतला होता. आम्हीच लढणार असे दावे त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक नेते करत होते, तर दुसरीकडे शिंदे (Eknath Shinde) गटाच्या खासदारांना या विषयावर काहीही बोलू नका, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. (Shivsena) या पार्श्वभूमीवर काल मुंबईत मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तब्बल चार तास बैठक घेतली.

विद्यमान १३ खासदारांची सविस्तर चर्चा केली, त्यांच्या मतदारसंघातील अडीअडचणी जाणून घेतल्या. (Maharashtra) विशेष म्हणजे तयारीला लागा, सर्व १३ खासदार असलेल्या मतदारसंघांत आपणच लढणार आहोत, याशिवाय ठाकरे गटाकडे असलेल्या ९ मतदारसंघांतही आपणच लढू, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी उपस्थितीत खासदारांना `लढा`, म्हटल्यामुळे राज्यातील सर्व १३ खासदारांचा जीव भांड्यात पडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कालच मुंबईत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व ४८ जागांची तयारी करा, असा आदेश देण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाच्या खासदारांमध्ये चलबिचल सुरू होती. त्यानंतर लगोलग मुख्यमंत्र्यांनी आपल्या १३ खासदारांची मॅरेथाॅन बैठक घेत त्यांना तुमचा मतदारसंघ आणि उमेदवारी सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. हा विश्वास घेऊनच आता हे सगळे खासदार कामाला लागणार आहेत.

शिवसेनेचे विद्यमान १३ खासदार आणि अन्य ९ ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी तयारी करण्याचे आदेश शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच महायुतीच्या घटक पक्षातील समन्वयासाठी खासदार राहुल शेवाळे यांची समन्वयक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे पक्षाचे नाव व चिन्ह आहे.

Shivsena Maharashtra News
Chandrashekhar Bawankule News : तुमच्या मनातील मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा; बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा

तसेच खासदारांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढवलेल्या २२ जागी उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे. असे झाले तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या खासदार संजय जाधव (परभणी), अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), विनायक राऊत (रत्नागिरी सिंधुदुर्ग), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र असेल.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com