Ajit Pawar : 'मुख्यमंत्र्यांचा आदेश आयुक्तांच्या बापालाही लागू करावा लागतो;' अजित पवारांचा करारी बाणा, काय आहे प्रकरण?

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजिण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन केले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Kalyan News : उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी ठाणे, कल्याण मतदारसंघात होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजिण्यात आला होता. या मेळाव्याला उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वसामान्यांना भेट देऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनसंदर्भातील समस्या मांडली. यावेळी मुख्यमंत्री एका मिनिटात हा प्रश्न सोडवतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी अजित पवार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Ajit Pawar
Sana Khan Murder Case : पोलिसांना आढळल्या मोठ्या प्रमाणावर फोटो आणि चित्रफिती

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कल्याण ग्रामीण परिसरातील वरप भागात आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि सामान्य लोकांनी अजित पवार यांना भेटून समस्या मांडल्या. यावेळी अजित पवार (Ajit pawar) यांच्यासमोर त्यांनी रखडलेला विषय उपस्थित केला.

यावेळी अजित पवार यांनी हे एक मिनिटाचं काम आहे, असे सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांनी हा निर्णय लागू केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी सांगितले की, ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्तांच्या बापालाही लागू करावा लागतो, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर तो कर्मचारी आनंदित झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात घेतला कार्यकर्ता मेळावा

अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde ) यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन कार्यकर्ता मेळावा घेतला. कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याची शक्यता त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केली.

R...

Ajit Pawar
Ajit Pawar : मनोज जरांगेंना अजित पवारांचे उत्तर, छगन भुजबळांना...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com