Chikhaldara Nagar Parishad Result : देवेंद्र फडणवीसांचा भाऊ बिनविरोध झालेल्या नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता, नगराध्यक्षपदी दणदणीत विजय!

Devendra Fadnavis BJP Vs Congress Nagar Parishad Result : 20 पैकी 12 नगरसेवक काँग्रेसचे विजयी झाले असून आठ ठिकाणी भाजपला विजय मिळवता आला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Congress News : नगरपंचायत आणि नगरपरिषदेतील निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरत असून सर्वाधिक जागांवर विजय मिळवताना दिसतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीआधीच नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मात्र, आज जाहीर झालेल्या या नगरपरिषदेची सत्ता काँग्रेसने मिळवली आहे.

20 पैकी 12 नगरसेवक काँग्रेसचे विजयी झाले असून आठ ठिकाणी भाजपला विजय मिळवता आला आहे. काँग्रेसचे नगराध्यक्ष शेख अब्दुल यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा 431 मतांनी पराभव केला आहे.

प्रभाग क्रमांक 10 मधून आल्हाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. येथून त्यांच्या विरोधात तीन अर्ज होते. मात्र, रवी राणा यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ कलोती यांना बिनविरोध निवडणूक आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना यश देखील आले.

Devendra Fadnavis
Ausa Nagar Parishad election Result : CM फडणवीसांच्या मर्जीतील आमदाराला मोठा धक्का; राष्ट्रवादीने चारली धूळ...

भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने या पालिकेवर भाजपची सत्ता येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जोरदार कमबॅक करत भाजपचा दणदणीत पराभव केला.

Devendra Fadnavis
Election Result : भाजपची दमदार हनुमान उडी, तर शहर विकास आघाडीने खाते उघडले, नगराध्यक्षाचा सस्पेन्सही संपणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com