

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
शहर विकास आघाडीनेही खाते उघडले असून जाई मुरकर यांचा विजय झाला आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शहर विकास आघाडी दोन्हींकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत.
Sindhudurg News : कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून आता विजयाचा जल्लोष देखील समोर येत आहे. येथे नगराध्यक्ष निवडणूक आम्ही जिंकणार, असा दावा भाजप आणि शहर विकास आघाडीकडून केला जात असतानाच आता निकाल हाती येत आहेत. हाती आलेल्या निकाला नुसार भाजपची दमदार हनुमान उडी घेतली आहे. तर शहर विकास आघाडीने देखील खाते उघडले आहे.
येथील तहसील कार्यालयातील मतमोजणी कक्षात सकाळी दहा पासून मतमोजणी सुरू झाली असून अर्ध्या तासात सर्व १७ प्रभागातील उमेदवार आणि नगराध्यक्ष कोण होणार याचा निकाल जाहीर होणार आहे. याचदरम्यान येथे पहिल्या फेरीत भाजपचे ७ उमेदवार विजयी झाले असून शहर विकास आघाडीच्या जाई मुरकर यांच्यासह दोघे विजयी झाले आहेत.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पहिल्या राऊंडमध्ये १ ते ५ प्रभाग मधील ईव्हीएम मशीन उघडण्यात आले. यामध्ये प्रभाग १ मध्ये राकेश राणे, प्रभाग २ मध्ये प्रतिक्षा सावंत प्रभाग ३ मध्ये स्वप्निल राणे, प्रभाग ४ मध्ये शहर आघाडीच्या जाई मुरकर आणि प्रभाग ५ मध्ये मेघा गांगण हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग ६ ते प्रभाग १० पर्यंत मतमोजणी दुसऱ्या राउंड मध्ये पार पडली. यामध्ये भाजपला ३ तर शहर विकास आघाडीला २ जागा मिळाल्या आहेत तर समीर नलावडे हे २६३ मतांनी आघाडीवर राहिले आहेत.
प्रभाग ६ मध्ये शहर विकास आघाडीच्या सुमेधा अंधारी यांना ३६४ तर भाजपच्या स्नेहा अंधारी यांना २८१ मते मिळाली. प्रभाग ७ मध्ये भाजपच्या सुप्रिया नलावडे यांना ६६९ तर शहर विकास आघाडीच्या सावी अंधारी यांना २४५ अशी मते मिळाली. प्रभाग ८ मध्ये शहर विकास आघाडीचे लुकेश कांबळे यांना ३६८ तर भाजपचे गौतम खुडकर यांना ३२४ मते मिळाली. प्रभाग ९ मध्ये भाजपच्या मेघा सावंत यांना ३४४ शहर विकास आघाडीच्या रीना जोगळे यांना १७६ आणि अपक्ष उमेदवार मधुरा मालकर यांना १६० मते मिळाली. प्रभाग १० मध्ये भाजपच्या उमेदवार आर्या राणे यांना ३२९ तर शहर विकास आघाडीच्या उमेदवार शितल मांजरेकर यांना २२९ मते मिळाली आहेत. कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग १७ पैकी प्रभाग १० पर्यंत मतमोजणी पूर्ण झालेली आहे. यामध्ये भाजपला ७ आणि शहर विकास आघाडीला ३ एवढ्या जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान येथे मंत्री नीतेश राणे, सावंतवाडीत आमदार दीपक केसरकर आणि मालवणात आमदार नीलेश राणे यांच्यासाठी राजकीय अस्तित्व सिद्ध करणारी ही निवडणूक असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शतप्रतिशत भाजप करण्यासाठी जिल्ह्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी जंगजंग पछाडले. विधानसभेनंतर अदृश्य झालेली ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस सक्रिय झालेली दिसली. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी मशाल पेटविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यातील चारही लढती राज्यात लक्षवेधी ठरल्या होत्या.
सन २०१८ मध्ये समीर नलावडे आणि संदेश पारकर यांच्यात नगराध्यक्षपदासाठी थेट लढत झाली होती. यात पारकर हे अवघ्या ३७ मतांनी पराभूत झाले होते. आताच्या निवडणुकीतही पारकर आणि नलावडे यांच्यात थेट मुकाबला आहे. यात शहर विकास आघाडी आणि भाजपकडून आपलाच उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होणार असा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर निकालानंतर विजयी मिरवणूक आणि त्यात डी.जे. वाजविण्याची परवानगी मिळावी यासाठी आज दोन्ही पक्षांकडून तहसील कार्यालयात परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होईल. तर १७ नगरसेवकांमधून भाजपचे उमेदवार बहुमताने निवडून येतील तर शहर विकास आघाडीचेही पाच ते सहा नगरसेवक निवडून येतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. दरम्यान, कणकवली नगरपंचायत निकालात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मुसंडी मारल्याचे आतातरी समोर येत आहे. तर कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडी विजयासाठी धडपडताना दिसत आहे.
1. कणकवली नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे का?
➡️ होय, मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या फेरीचे निकाल समोर आले आहेत.
2. पहिल्या फेरीत भाजपचे किती उमेदवार विजयी झाले?
➡️ पहिल्या फेरीत भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
3. शहर विकास आघाडीला पहिला विजय मिळाला आहे का?
➡️ होय, जाई मुरकर यांच्या विजयामुळे आघाडीने खाते उघडले आहे.
4. नगराध्यक्षपदासाठी कोण दावा करत आहे?
➡️ भाजप आणि शहर विकास आघाडी दोन्ही बाजू विजयाचा दावा करत आहेत.
5. पुढील फेऱ्यांमध्ये काय अपेक्षित आहे?
➡️ उर्वरित फेऱ्यांतील निकालांवर अंतिम सत्तासमीकरण ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.