Kamla Gavai RSS Event : सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमल गवई संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या मुख्य 'अतिथी'!

Bhushan Gavai Mother Kamla Gavai RSS : रिपब्लिकन चळवळीशी गवई कुटुंबाची नाळ जुळलेली आहे. मात्र, संघाचे निमंत्रण स्वीकारून कमला गवई या त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Bhushan Gavai Mother Kamla Gavai
Bhushan Gavai Mother Kamla Gavaisarkarnama
Published on
Updated on

Kamla Gavai News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीच्या शाखेच्या वतीने विजयदशमी उत्सवाचे आयोजन पाच ऑक्टोबरला केले जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कमल गवई उपस्थित राहणार आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

अमरावतीच्या श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवार (5 ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता विजदशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक आणि संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य जे. नंदकुमार उपस्थित राहणार आहेत.

रिपब्लिकन चळवळीशी गवई कुटुंबाची नाळ जुळली असताना संघाच्या कार्यक्रमाला कमल गवई हजेरी लावणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कमला गवई यांचे पती रा.सू. गवई यांनी विदर्भात रिपब्लिकन चळवळीची जबाबदारी स्वीकारली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नेतृत्व त्यांनी केले होते.

Bhushan Gavai Mother Kamla Gavai
MPSC Exam : MPSC राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम! अतिवृष्टीचा विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच, आयोगाने थेट 'ते' परिपत्रकच जारी केलं

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात रा. सू. गवई मंत्री होते. ते पवार यांचे विश्वासू मानले जात. नंतरच्या काळात ते राज्यपाल देखील झाले होते. त्यांचे पुत्र भूषण गवई हे सध्या देशाचे सरन्यायाधीश आहेत. दुसरे पुत्र राजेंद्र गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व करीत आहेत.

विजयदशमी सोहळ्यातील प्रमुख पाहुणे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याला नागपूर येथे प्रमुख अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाते. यंदा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी वैज्ञानिक डॉ. के. राधाकृष्णन, परम संगणकाचे निर्माते विजय भटकर, संरक्षण क्षेत्रातील संशोधक डॉ. व्ही.के. सारस्वत, नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी, एचसीएलचे संस्थापक शिव नादर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले आहेत.

Bhushan Gavai Mother Kamla Gavai
पाकिस्तान आता भारताच्या टप्यात! ‘अग्नी प्राइम’ धावत्या ट्रेनमधून शत्रूंवर हल्ला करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com