Devendra Fadnavis : 'तुम्ही आलात, पण 'मी पुन्हा येईल', असं म्हणालाच नव्हता'; फडणवीसांकडून नार्वेकरांच्या न्यायाधीशाच्या भूमिकेचं कौतुक

Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाचे भाषण चर्चेत आले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा अध्यक्षपदाची सूत्र राहुल नार्वेकर यांनी हाती घेतल्यानंतर महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीचा न्यायाधीश, असा उल्लेख केला.

'याशिवाय तुम्ही आला, पण मी पुन्हा येईल, असे म्हटलाच नव्हता. तरी तुम्ही परत आलात, त्याबद्दलचे तुमचे अभिनंदन', असे फडणवीस यांनी कौतुक केले.

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रि‍पदाची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेताच, विशेष अधिवेशन बोलवले. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवड या अधिवेशनात झाली. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी काल रविवारी अर्ज भरला होता. एकमेव अर्ज आल्याने, राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.

Devendra Fadnavis
ShivSena Politics : मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची फिल्डिंग; संघटना बांधणीचा हा आहे 'प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनुमोदन दिले. नार्वेकर यांना मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना अध्यक्षपाच्या आसनापर्यंत सन्मानानं नेलं.

Devendra Fadnavis
Shahada Asalod Liquor Ban : महिलांनी करुन दाखवलं; बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात दारुची बाटली अखेर 'आडवी'

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नार्वेकर यांच्या सन्मानात केलेल्या भाषणात न्यायाधीशाची अडीच वर्षे भूमिका निभावल्याचे कौतुक केले. फडणवीस म्हणाले, "गेली अडीच वर्षे कन्फ्यूजन अधिक होते. कोण कोठे होते हेच कळत नव्हते. याच काळात तुम्ही न्यायाधीशांचे काम केले".

"अध्यक्ष महोदय, "मी पुन्हा येईल" असं तुम्ही म्हणाला नव्हता. तरी तुम्ही परत आलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही खुर्चीला न्याय देण्याचे काम कराल. नाना भाऊ (नाना पटोले यांना उद्देशून) तुम्ही वाट मोकळी केलीत म्हणून नार्वेकरांना संधी मिळाली", असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील भाषणादरम्यान लगावला. नाना माझे चांगले मित्र आहेत. ते फक्त राजकीय विरोधक आहे, असेही फडणवीस यांनी म्हंटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com