
Mumbai News : महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. मविआतील तिन्ही पक्षांना महायुतीच्या छुप्या लाटेने एकप्रकारे उद्धवस्तच केले. यातून सावरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मविआ प्रयत्न करताना दिसेल.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला असलेला मुंबईचा गड देखील विधानसभा निवडणुकीत ढासळला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत टाळण्यासाठी शिवसेनायुबीटी पक्षाने त्यांचा 'प्लॅन' तयार केला आहे.
शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. जवळपास अपयशच आले. पण मुंबईने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला साथ दिली. मात्र हक्कांच्या काही जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे पक्षाच्या संघटनेची बांधणी तळातून करावी लागणार असल्याचे समोर आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी त्यावर काम सुरू केले असून, ज्येष्ठ, तरुण, युवक-युवती यांची मोठी फळी पक्षाबरोबर कशी उभारता येईल आणि संघटन किती मजबूत करता येईल, यावर भर दिला आहे. यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी करताना पक्षातील जुन्या जाणत्या आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचे मार्गदर्शन घेणार आहोत. विधानसभा निवडणुकीत जनमानसाची साथ आम्हाला असतानाही झालेला विधानसभा निवडणुकीत आम्हाला धक्का बसला आहे. आता त्याची कारणमीमांसा करत आहोत. महापालिका निवडणुकीला नेटाने सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
मुंबईतील गटप्रमुख आणि शाखा हा आमच्या राजकारणाचा आत्मा होता. विविध कारणांनी हा पाया हलला आहे. म्हणूनच पुन्हा शाखा सक्षम करण्यासाठी आमच्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी आता मार्गदर्शक म्हणून पुढे आणणार आहोत. त्याचप्रमाणे नव्या पिढीच्या मागे पुन्हा एकदा आपला अनुभव आणि ताकद उभी केल्यास महापालिकेवरील भगवा कुणीही काढू शकणार नाही, अशी खात्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेवर मराठी माणसांचा, हिंदुत्वाचा झेंडा आहे. तो उतरू नये, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर संघटनावर भर राहील. महापालिका निवडणुकीतही विरोधकांकडून वेगवेगळ्या अस्त्रांचा आणि षडयंत्रांचा वापर नक्कीच होणार आहे. ईव्हीएम आणि निवडणूक यंत्रणा त्यांच्या दावणीला बांधलेली आहेच. त्याची आता मानसिक तयारी करूनच, विरोधकांना सक्षमपणे टक्कर देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्वीप्रमाणे तळागाळात काम करणारी आणि शाखा-शाखांवर मजबुतीने उभा करण्यावर आगामी काळात भर राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीला राज्यात आमच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र मुंबईने आणि इथल्या शिवसैनिकांनी आम्हाला साथ दिली. मनात राम आणि हाताला काम देणाऱ्या उद्धवसेनेच्या हिंदुत्वावर त्यांनी विश्वास ठेवल्याचे सिद्ध झाले आहे. विरोधकांची षडयंत्र जास्त काळ चालणार नाहीत. ही उधळून लावण्यासाठी मुंबईतील मराठी माणूस सक्षम असल्याचा टोला देखील आदित्य ठाकरेंनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.