Devendra Fadnavis: विरोधकांना धक्का देण्यासाठी फडणवीसांची अधिवेशनात काळातच 'मास्टर'खेळी; 'या' धडाकेबाज अधिकाऱ्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

Mahayuti Government : महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर सीएम फडणवीसांनी केलेली धवसे यांची नियुक्ती मोठी खेळी असल्याची चर्चा आहे.
Devendra Fadnavis 5
Devendra Fadnavis 5Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारली आहे. त्यांनी महाराष्ट्राचा गाढा हाकताना आपल्या दिमतीला त्यांच्या मर्जीतले अनेक प्रशासकीय अधिकारी घेतले आहेत. याचदरम्यान,आता फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांना धक्का देण्यासाठी पुन्हा एकदा मास्टरस्ट्रोक लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कायमच परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याची कामगिरी दमदार असल्याचा दावा केला जातो. तर विरोधकांकडून या दाव्यावर नेहमीच शंका घेतली जाते. पण आता फडणवीसांनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक यावी,उद्योगधंदे वाढावेत आणि रोजगारनिर्मित्ती व्हावी यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौस्तुभ धवसे यांची मुख्य गुंतवणूक सल्लागार म्हणून निवड केली आहे. गेल्या 11 वर्षांपासून धवसे हे फडणवीसांचे विश्वासू अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांच्याकडे महाराष्ट्रातील गुंतवणुकीची धुरा सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून कौस्तुभ धवसे यांची ओळख आहे. त्यांची आता मुख्यमंत्रांचे मुख्य सल्लागार – गुंतवणूक व धोरण नव्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी धवसे हे 2014 पासून मुख्यमंत्री यांचे सहसचिव व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Devendra Fadnavis 5
Nagpur ZP Election: 'झेडपी'च्या निवडणुकीत सलील देशमुखांसह दिग्गज नेत्यांचं राजकारण वाचणार की पुन्हा आरक्षणाचा फटका?

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने (Maharashtra) प्राप्त केली आहे.

2024-2025 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांत आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आल्याचं या अहवालात म्हटलं होतं. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक असल्याचा दावाही करण्यात आला होता.

Devendra Fadnavis 5
स्थानिकच्या आधीच भास्कर जाधवांना लॉटरी!, भाजपसह शिवसेनेच्या चिंतेत वाढ! उदय सामंतांचीही धाकधूक वाढली!

मुख्यमंत्रांचे मुख्य सल्लागार – गुंतवणूक व धोरण पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या कौस्तुभ धवसे यांचा जन्म दादरमध्ये आहे धवसे हे महाराष्ट्र सरकारचे सहसचिव आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. महाराष्ट्रात 2022-23 या वर्षात 1 लाख 18  हजार 422 कोटी परकीय गुंतवणूक आली होती. तर, 2023-24 मध्ये  1 लाख 25हजार 101 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. 

Devendra Fadnavis 5
Devendra Fadnavis On Ambadas Danve : अंबादास दानवे भाजपच्या मुशीत तयार झालेले; म्हणून त्यांच्यात संघटनात्मक कौशल्य अन् अभ्यासू वृत्ती!

दरम्यान, राज्यात गेल्या काही वर्षांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. तसेच नुकतेच अमेरिकेतील प्रसिध्द उद्योजक एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं शोरुम देखील महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सुरु झालं आहे. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर सीएम फडणवीसांनी केलेली धवसे यांची नियुक्ती मोठी खेळी असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com