स्थानिकच्या आधीच भास्कर जाधवांना लॉटरी!, भाजपसह शिवसेनेच्या चिंतेत वाढ! उदय सामंतांचीही धाकधूक वाढली!

Bhaskar Jadhav And Ratnagiri zp ps reshuffle : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषदेचा प्रारूप मसूदा जाहीर केला आहे. यामुळे अनेकांच्या गुडघ्याला असलेले बाशिंग उतरले आहे. तर नव्यांना संधीचे दारं उघडली आहेत.
Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshuffle
Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshufflesarkarnama
Published on
Updated on
  1. ZP आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गणांची नवी प्रारूप रचना जाहीर करण्यात आली असून, संख्येत बदल झाला आहे.

  2. पूर्वीच्या 55 गट व 110 गणांऐवजी आता 56 गट व 112 गण झाले असून, गुहाघर मतदारसंघात 1 गट व 2 गणांची वाढ झाली आहे.

  3. याचा थेट फायदा आमदार भास्कर जाधव (ठाकरे गट) यांना होणार असून, भाजप व शिंदे गट यांच्यासमोर कठीण लढत असणार आहे.

Ratnagiri News : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गट आणि गणांचा प्रारूप मसूदा जाहीर केला आहे. नव्याने केलेल्या प्रारूप प्रभाग पुनर्रचनेतील आधीच्या 62 गट आणि 124 गणांची असलेली संख्या कमी झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यात 56 गट तर 112 गणांची संख्या असेल. पण नव्याने केलेल्या प्रारूप प्रभाग पुनर्रचनाच संपूष्टात आल्याने पूर्वीच्या गट आणि गणाच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी 55 गट आणि 110 गणांची संख्या होती. यामुळे आता झालेल्या प्रारूप मसूद्यानुसार एक गट आणि दोन गणांची निर्मिती झाली आहे. जी गुहागर मतदार संघात झाली आहे. याचा थेट लाभ उद्धव बाळासाबेह ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांना होणार आहे. पण कुणबी कार्ड खेळलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना येथे भास्कर जाधव यांना कडवी झूंझ देताना दिसेल.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गट आणि गणांचा प्रारूप मसूदा प्रसिद्ध केला. या गट आणि गणांवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 21 जुलै दिली आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी हा गट वाढला आहे. हा गट आसगोळी या पट्ट्यात येत असून सध्या येथे भाजपचे वारे आहे. पण भास्कर जाधव यांच्या फेव्हरमधला आहे.

भास्कर जाधव तसे कडवे शिवसैनिक त्यांनी दोन वेळी धनुष्यबानावर निवडणुक लढवली आणि जिंकलीही. 1995 आणि 2004 च्या दरम्यान ते सिवसेनेचे आमदार होते. पण तिसऱ्यांदा हॅट्रीक होणार तोच त्यांचा पराभव झाला. त्यावेळी त्यांना शिवसेनेनं तिकीट दिलं नाही. म्हणून ते अपक्ष उबारले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले आणि 2009 मध्ये विरोधी पक्ष नेते रामदार कदम यांचा पराभव केला. 2004 च्यावेळी त्यांनी जे बंड केलं त्याची चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतरच नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडाला शिवसेनेला सामोरं जावं लागलं होते. दोघांनीही शिवसेना सोडली होती. पण 2019 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनी बोलवून परतण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ते शिवसेनेत आजही आहेत 2019 आणि 2024 असे दोनदा ते आमदार झाले. पण 2024 मध्ये त्यांचा विजय त्यांना आत्मचिंतन करवणारा ठरला आहे.

Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshuffle
Bhaskar Jadhav : 'कोणी एकानं चालवणारं हे खातं...'; शिवसेना,भाजपनंतर भास्कर जाधवही निधीवाटपावरुन अजितदादांवर भडकले

पुन्हा कुणबी पॅटर्न?

जिल्ह्यातील हा तालुका आणि भास्कर जाधव यांचा गुहागर मतदार संघ हा कुणब पट्टा आहे. येथे पक्ष आणि नेत्यापेक्षी कुणबी कार्ड चालतं. यामुळे येथे 2024 च्या निवडणुकीत कुणबी कार्ड काढण्यात आलं. पार पडलेल्या निवडणुकीत भास्कर जाधव यांचा फक्त 2800 मतांनी विजय झाला. पण घटलेल्या मतदानात कुणबी फॅक्टर प्रभावी ठरला.

राजेश बेंडल मैदानात

विधानसभेवेळी मतदार संघातील कुणबी पॅटर्न लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखली होती. त्यांनी भास्कर जाधव यांच्याविरोधात श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे राजेश बेंडल यांना मैदानात उतरवले होते. यामुळे मोठी चुसर पहायला मिळाली होती. 320 बुध असणाऱ्या या मतदार संघातील 140 बुथ असणाऱ्या गुहागरमध्ये कुणबी समाज मोठा आहे. तर याचे प्रतिनिधीत्व राजेश बेंडल करताना दिसतात. याआधी देखील त्यांनी भास्कर जाधव यांना धक्का देत नगरपंचायतीत बंडखोरी करत सत्ता पालटवली होती. त्याचपद्धतीने आताही जिल्ह्याची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती डावपेच खेळण्याची शक्यता आहे.

Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshuffle
Bhaskar Jadhav Politics : नाराज नाही म्हणणाऱ्या भास्कर जाधवांचा सरकारच्या विधेयकाला पाठींबा, सगळीच गणितं बदलली?

जर... तर... चे राजकारण

सध्या महाविकास आघाडीचे कोकणात म्हणावे तसे काही शिल्लक नाही. जे काही आहे ते फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे. येथे भास्कर जाधव म्हणजेच महाविकास आघाडी. त्यामुळे सध्या मविआला स्थानिक काबिज करायची असेल तर महायुती कोणता डाव टाकते याकडे लक्ष द्यावे लागले. येथे भाजपसह शिवसेनेत अने इच्छुक आहेत. त्यांना संधी न मिळाल्यास येथे बंडखोरी होऊ शकते. आणि याचाच लाभ भास्कर जाधवांसह विनायक राऊत आणि महाविकास आगाडीतील मित्र पक्षांना उचलता येऊ शकतो. पण जर का महायुती एक संघ राहून एकास एक उमेदवार दिल्यास पुन्हा विधानसभेसारखेच येथे चित्र पहायला मिळेल. यामुळे सध्या भास्कर जाधव असो किंवा विनायक राऊत हे इतरांबरोबर फक्त चर्चा करताना आणि आपल्या पक्षाच्या बैठका आणि मेळावे घेताना दिसत आहेत.

ठाकरे बंधुंची युती?

राज्यात ठाकरे बंधुंची युतीबाबतही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे तसे झाल्यास येथे मनसे-शिवसेना एकत्र येऊ शकते. पण अद्याप राज्य पातळीवर तशी कोणतीच चर्चा सुरू नाही. पण रत्नागिरी जिल्ह्यात मात्र सध्या मनसे-शिवसेना हातात हात घालून चालताना दिसत आहेत. आगामी स्थानिकलाही असेच चित्र दिसू शकते. यामुळे किमान गुहागरमध्ये महायुतीला रोखण्यासाठी भास्कर जाधव यांना मनसेचा मोठी ताकद मिळू शकते.

सरपंच आरक्षण

दरम्यान जिल्ह्यातील सरपंच आरक्षण जाहिर झाले असून आरक्षणात फेरबदलामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. आरक्षणात फेरबदलामुळे 59 टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे. निवडणूक विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 847 ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महिलांसाठी 425 पदे राखीव करण्यात आली आहेत. त्यामुळे पन्नास टक्केहून अधिक ग्रामपंचायतींवर महिलाराज दिसणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 571 जागा असून, त्यातील 286 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे 285 जागांवर चुरस निर्माण होणार आहे. इतर मागासवर्ग पदासाठी 229 पैकी 115 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गात 36 पैकी 18 जागा, तर अनुसूचित जमातीसाठी 11 पैकी 6 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshuffle
'Devendra Fadnavis यांनी माझ्यावर हे प्रेम कायम ठेवावं', Bhaskar Jadhav नेमकं काय म्हणाले ? |

प्र. गट आणि गणांची संख्या कितीने वाढली आहे?
उ: जिल्ह्यातील गटांची संख्या 55 वरून 56 झाली असून, गणांची संख्या 110 वरून 112 झाली आहे.

प्र. गुहाघरमध्ये कोणता राजकीय पक्ष लाभात आहे?
उ: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना नव्या गट-गण निर्मितीमुळे थेट राजकीय फायदा होणार आहे.

प्र. भाजप व शिंदे गट काय करत आहेत?
उ: भाजपने जातीय गणित (कुणबी कार्ड) राबवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र नव्या प्रभाग रचनेमुळे त्यांच्यासमोर आव्हान वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com