Devendra Fadnavis : दावोसमधील करारांवर संशय घेणाऱ्यांना CM फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले, कागदी करारात...

CM devendra Fadnavis Strong Reply to Doubters of Davos Agreements : फडणवीस यांनी दावोस येथे झालेल्या एकूण करारांपैकी पाच लाख कोटींची गुंतवणुकीचे करार विदर्भात झाले असल्याचे सांगितले.
Devendra Fadnavis 1
Devendra Fadnavis 1Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : महाराष्ट्रातील उद्योजकांसोबतच एमओयू करायचे होते तर दावोसला कशासाठी गेला, यापूर्वीच्या औद्योगिक करारांचे काय झाले? किती गुंतणूक झाली? किती रोजगार उपलब्ध झाला? असे असंख्य प्रश्न विरोधकांच्यावतीने उपस्थित केले होते. महायुती सरकाराला याचा जाबही विचारत श्वेतपत्रिका काढण्याची मागणीसुद्धा केली होती. यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सडेतोड उत्तर दिले.

महाराष्ट्रात औद्योगिक करारांच्या अंमलबजावणी करण्याचा स्ट्राईक रेट तब्बल 80 ते 90 टक्के असल्याचे सांगून त्यांनी आम्ही फक्त कागदी करार करत नसल्याचा टोला विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Devendra Fadnavis 1
Uday Samant : काँग्रेसच्या बड्या नेत्याला शिंदेंच्या शिलेदाराचा टोला; म्हणाले, "तुमच्या पक्षात काय सुरू आहे ते आधी बघा..."

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्य पुढाकारने 'ॲडव्हांटेज विदर्भ'चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जेएसडब्ल्यू कंपनीचे सज्जन जिंदाला आणि गडचिरोलीमध्ये कोट्यवधीची गुंतणूक करणारे सूरजागड प्रकल्पाचे प्रभाकरण प्रामुख्याने उपस्थित होते.

त्यांच्या साक्षीने फडणवीस यांनी दावोस येथे झालेल्या एकूण करारांपैकी पाच लाख कोटींची गुंतवणुकीचे करार विदर्भात झाले असल्याचे सांगितले. साधारणतः एमओयूचे प्रत्यक्ष गुंतवणुकीची सरासरी देशात 50 टक्के इतकी आहे. महाराष्ट्रातमात्र 80 ते 90 टक्के इतकी आहे, असे फडणवीस म्हणाले.

मेक इन इंडिया अंतर्गंत विदर्भात 274 एमओयू झाले होते. यापैकी 190 कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. 14 कंपन्यांचे काम प्रगतीपथावर आहे. 57 कंपन्यांनी मान्यतेसह सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. फक्त पाच कंपन्यांनी काहीच काम सुरू केले नाही.

दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र मॅग्नेटिकमध्ये 138 कंपन्यांसोबत विदर्भात गुंतवणूक करण्याचे करार केले होते. यापैकी 55 कंपन्यांनी उत्पादन सुरू केले,19 कंपन्यांचे इन्फास्ट्रक्चरचे काम सुरू केले आहे. 49 कंपन्यांनी वेगवेगळ्या मान्यता प्राप्त केल्या आहेत. फक्त एका कंपनीने करारानुसार काम सुरू केले नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उद्योगांना प्रोत्साहन देतो

आम्ही फक्त कागदी करार करीत नाही. करार केल्यानंतर आम्ही पाठपुरावा करतो, उद्योगकांसोबत संवाद साधतो. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन सोडवते आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis 1
Nagpur Politic's : बावनकुळेंनी थेट बैठकीतून अजितदादांना फोन लावला अन्‌ नागपूरसाठी पुन्हा मिळविला 42 कोटींचा निधी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com