Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule-Ajit PawarSarkarnama

Nagpur Politic's : बावनकुळेंनी थेट बैठकीतून अजितदादांना फोन लावला अन्‌ नागपूरसाठी पुन्हा मिळविला 42 कोटींचा निधी

Chandrashekhar Bawankule News : राज्यात महाविकास आघाडी आणि नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असताना 42 कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला होता. ते राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा खेचून आणला आहे.
Published on

Nagpur, 07 February : राज्यात महाविकास आघाडी आणि नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असताना ४२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला होता. ते राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा खेचून आणला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत थेट चर्चा करून हा निधी बावनकुळे यांनी नागपूरला मिळवून दिला आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेला १४२ रुपये कोटी विकास कामांसाठी उपलब्ध झाले आहेत.

महविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात अडीच वर्षे महायुतीचे सरकार होते आणि जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे हा अखर्चित निधी तसाच पडून होता. तो निधी मिळावी, यासाठी कोणीच पाठपुरावा केला नव्हता. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेला (Nagpur Zillha Parishad) हा ४२ कोटी रुपयांचा मागील वर्षांचा अडकलेला ४२ कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नागपूर जिल्ह्याचे सूत्रे हाती घेताच चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी जुन्या फाईलींवरची धूळ पुन्हा झटकली. त्यात ४२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित असल्याचे आढळून आले. नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून त्यांनी थेट अजित पवार यांना फोन लावला होता. त्यांनीसुद्धा बावनकुळे यांच्या विनंतीला तत्काळ होकार कळवला होता.

Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar
Solapur Sugar Sector : भाजप नेत्यांच्या तीन, तर काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या एका कारखान्याला साखर आयुक्तांचा दणका; विनापरवाना गाळप भोवले

या संदर्भात अलीकडेच झालेल्या नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४२ कोटी रुपयांच्या अखर्चित निधीबद्दल माहिती मिळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निधी लगेच सरकारकडून प्राप्त करून घेण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. आणि ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ४२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित असल्यामुळे हा १०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.

Chandrashekhar Bawankule-Ajit Pawar
Vidharbha Politic's : मायावतीच्या पक्षातील मातब्बरांना चंद्रशेखर आझादांनी लावले गळाला; बसपाची महाराष्ट्रातील स्पेस व्यापली

पालकमंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना विनंती करून ही तांत्रिक अडचण देखील दूर केली आहे. त्यामुळे एकूण १४२ कोटी रुपयांचा निधी आता नागपूर जिल्हा परिषदेला प्राप्त होईल आणि या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील अनेक विकास कामे आता मार्गी लागतील.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com