Eknath Shinde On Rahul Gandhi : आरक्षणावर राहुल गांधींचं मोठं विधान; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'पोटातलं खरं त्यांच्या ओठावर आलं'

Eknath Shinde condemns Rahul Gandhi statement on anti-nationalism and reservation : अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या आणि आरक्षण विरोधी विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निषेध केला.
Eknath Shinde On Rahul Gandhi
Eknath Shinde On Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्यावर केलेल्या विधानावर त्यांना विरोधकांकडून घेरलं जातंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचा देशविरोधी आणि आरक्षणविरोधी चेहरा समोर आला आहे. परदेशात जात, तिथं देशाचा आपण करण्याच्या काँग्रेस संस्कृतीचा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला.

काँग्रेस (Congress) नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर आहे. तेथील कार्यक्रमात ते सहभागी होत आहे. देशातील परिस्थितीवर भाष्य करताना, त्यांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केलं. जोपर्यंत निष्पक्षता येत नाही, तोपर्यंत आरक्षण सुरू राहणार, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. या विधानावर राहुल गांधी विरोधक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर टीका केली आहे.

Eknath Shinde On Rahul Gandhi
Sanjay Raut On PM Modi : चीन घुसलाय, मणिपूर जळतंय; मोदी आणि शाह कुठंय?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "परदेशात आपल्या देशाची बदनामी करणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. आरक्षण रद्द करण्याची त्यांची भाषा म्हणजे, पोटातलं खरं त्यांच्या ओठावर आलं. आरक्षण विरोधी चेहरा काँग्रेसचा आहे, हे आता समोर आलं आहे. आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे". संविधान विरोधी कोण आहेत, हे संपूर्ण देशाला समजलं. आगामी काळात जनताच काँग्रेसला धडा शिकवेल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

Eknath Shinde On Rahul Gandhi
Amit Shah : राहुल गांधींवर अमित शाह भडकले; म्हणाले, जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत..! 

बाबासाहेबांना धोका दिला

"काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिला. काँग्रेसनं दोनदा बाबासाहेबांना पराभूत करून धोका दिला. बाबासाहेबांना जे धोका देऊ शकतात, ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात. बाबासाहेब नेहमी सांगायचे की, काँग्रेस हे जळतं घर आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानानं दिलेलं आरक्षण कायम राखण्यासाठी केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकार जनतेच्या पाठिशी उभी आहे, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

फेक नरेटीव्ह समोर आला

'आरक्षण रद्द करण्याची हिमत कोणी करेल, त्याच्याविरोधात राज्य आणि केंद्र सरकार उभं राहील. आता आरक्षणावरून काँग्रेसचा खरा चेहरा कळला असेल, लोकसभेमध्ये फेक नरेटीव्ह पसरवून, संविधान बदलणार-संविधान बदलणार, त्याच बाबासाहेबांनी संविधानानं दिलेले आरक्षण रद्द करणार, असे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस बोलू लागली आहे. यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा समोर आला असून, याचा निषेध आहे', असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

पंतप्रधानांचं कौतुक

'देशप्रेम काय आहे, हे देशातील जनतेने विचार केला पाहिजे. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडून देशाची परदेशात बदनामी करणे, हे कोणतं देशप्रेम? कोणती राष्ट्रभक्ती? असा सवाल करत जगाला हेवा वाटावा, असं भारताचं नावलौकीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यासाठी काम करत आहेत. अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी काम करत असताना दुसरीकडं देशाचा अपमान करणारे विधान, देशाचा अपमान करणारे राहुल गांधी हे संपूर्ण देशाला समजलेत', असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com