Sanjay Raut On PM Modi : चीन घुसलाय, मणिपूर जळतंय; मोदी आणि शाह कुठंय?

Sanjay Raut criticizes PM Narendra Modi and Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मणिपूर आणि चीनच्या घुसखोरीवरून संजय राऊत यांनी टीका केली.
Sanjay Raut On PM Modi
Sanjay Raut On PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : "पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय दौरे करत आहेत, तर भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकींसाठी मुंबईचे दौरे करत आहेत. हे कमजोर पाकिस्तानला डोळे दाखवतात, पण चीनला डोळे दाखवू शकत नाहीत.

अरुणाचलमध्ये 60 किलोमीटरपर्यंत चायना घुसलाय, लडाखमधील जमीन खाल्लीय. मणिपूरवर बोलायला तयार नाहीत. आता पंडित नेहरू नाहीत, दोष द्यायला", असा घणाघात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि शाह यांच्या राजकारणावर केला.

शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी मणिपूर आणि देशात घुसखोरी करत असलेल्या चीनच्या मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चीनच्या घुसखोरीवर बोलूच शकत नाहीत, असे म्हणत पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये गुंतलेत, तर अमित शाह विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई दौरे आणि शेअर बाजारावरती बोलतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut On PM Modi
Amit Shah : राहुल गांधींवर अमित शाह भडकले; म्हणाले, जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत..! 

संजय राऊत म्हणाले, "मोदी (BJP) आणि शाह फक्त कमजोर पाकिस्तानला डोळे दाखवू शकतात. चीन घुसखोरी करतोय, अरुणाचलमध्ये 60 किलोमीटरपर्यंत घुसलाय, लडाखमध्ये जमीन खाल्लीय, त्यावर हे दोघंही बोलू शकत नाही". देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे स्वतःला विश्वगुरू नॉन बायोलॉजिकल ईश्वराचे अवतार मानतात, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध मिटवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध भूमीवर जातात, त्यावेळी चार सात रशिया आणि युक्रेन एकमेकांवर हल्ला करत नाही, असे ढोल वाजतात, त्यांना जळत असलेला मणिपूर दिसत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut On PM Modi
Kirit Somaiyya News : किरीट सोमय्या भाजपवर नाराज? चक्क पक्षाचा 'आदेश' धुडकावला; बावनकुळेंसह दानवेंनाही पत्र

महानेत्यानं अपयश स्वीकारलं पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपरोधिकपणे टीका करताना, 'पुतिन यांच्याबरोबर चहा पितात, युक्रेनचे झेलेन्स्कींना भेटतात, युद्धी बंदीवर चर्चा करतात, असा निधड्या छातीचे नेते आपल्या देशाला लाभले आहेत, पण या महानेत्याला आपल्याच देशातील मणिपूरमधील अत्याचार थांबवता येत नाहीत. हे अपयश या महानेत्यानं अपयश स्वीकारलं पाहिजे', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

काश्मीरपेक्षा मणिपूरची भयंकर स्थिती

एअर इंडिया वन घेऊन मोदी जगभरात फिरत आहेत, परंतु मणिपूरला गेले नाहीत. गृहमंत्री अमित शाह मुंबईत येतात, राजकीय बैठका घेतात, निवडणुकांची तयारीचा आढावा घेतात, आमच्यावर टीका करतात, पण मणिपुरवर कधी बोलणार? असा प्रश्न करताना दोष देण्यासाठी आता पंडित नेहरू नाहीत, अशी कोपरखळी देखील संजय राऊत यांनी लगावली. मणिपूरची आजची अवस्था ज्या काळात काश्मीर पेटलं होतं, त्यापेक्षा भयंकर आहे. यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह एक अक्षर बोलायला तयार नाही, याचा अर्थ या देशातल्या जनतेने काय घ्यायचा, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com