CM Fadnavis reaction: मनोज जरांगे यांच्या मोर्चावर सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'त्यांच्या मागण्या...'

Political News : या बैठकीप्रसंगी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यभरात 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मोर्चा घेऊन आले तर मोठा जनसमुदाय मुंबईत दाखल होऊ शकतो. यामुळे यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी रविवारी मांजरसूंबा येथे सभा घेत येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर आपण ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Eknath Shinde new move : एकनाथ शिंदेंनीच सुरू केले 'डॅमेज कंट्रोल' ऑपरेशन; 'ही' नवी खेळी यशस्वी ठरणार?

मराठा समाजासाठी महायुती सरकारने केलेले काम सर्वांना माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारे आमचे सरकार आहे. मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना, त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. ते आरक्षण सुरु आहे. आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Shiv Sena vs BJP: शिवसेनेनं निलंबित केलेल्या नेत्याला भाजपनं हेरलं... निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेचं राजकारणचं फिरवलं!

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आहे. पुढेही आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे या संदर्भात कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. पण लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ, अशी भूमिका सीएम फडणवीस यांनी मांडली आहे.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Fadnavis on Raj Thackeray : युतीबाबत फडणवीसांकडून एक घाव दोन तुकडे; राज ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चेवर मोठे विधान, म्हणाले...

महायुती सरकारच्या काळात मराठा समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था केली आहे. मराठा समाजाच्या मुलांना राहण्यासाठी आपण त्यांना भत्ता देण्याची योजना सुरु केली आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त आला पाहिजे, यासाठी सारथी सारख्या संस्थेसोबत आपण काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक आयएएस अधिकारी सारथीच्या माध्यमातून तयार केले आहेत. सारथीच्या माध्यमातून अनेक एमपीएससीचे विद्यार्थी तयार केले आहेत,' असा दावा सीएम फडणवीस यांनी केला.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Jayant Patil Exclusive : रिलॅक्स झालेले जयंत पाटील म्हणतात, 'रेंजमध्ये आल्यावर टप्प्यात कार्यक्रम...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com