Eknath Shinde new move : एकनाथ शिंदेंनीच सुरू केले 'डॅमेज कंट्रोल' ऑपरेशन; 'ही' नवी खेळी यशस्वी ठरणार?

Tanaji Sawant discontent : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी खेळी खेळली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नाही. या सत्तेत असलेल्या महायुतीमधील तीन पक्षात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर आल्या असल्याने जोरदार रस्सीखेच दिसत आहे.

त्यामुळेच या तीन पक्षात सध्या नेतेमंडळींना खेचण्यासाठी चढाओढ दिसत आहे. त्यातच आता डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी खेळी खेळली असून त्यासाठी आता गेल्या काही दिवसापासून नाराज असलेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांना बोलावून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

नऊ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी निसटता विजय मिळवला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील पाच मंत्र्यांना पुन्हा संधी दिली नव्हती. तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नव्हती. तेव्हापासून ते नाराज होते.

विशेषतः ते मतदारसंघात अथवा शिवसनेच्या कुठल्याच बैठकीला त्यांनी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिव जिल्ह्यात निवडून आलेला एकमेव आमदारही एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ही निर्णय घेताना अडचण होत आहे.

Eknath Shinde
Sanjay Raut on BJP : "फडणवीस अर्धवट ज्ञानी, गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही"; जावेद मियाँदादच्या मातोश्री भेटीची आठवण करून देताच राऊत भडकले, भेटीचा तपशीलच सांगितला

दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात तानाजी सावंत व त्यांचे बंधू आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी ही रामराम ठोकला आहे. त्यामुळे सावंत कुटुंबिय शिंदे सेनेवर नाराज असल्याचे बोलले जात होते. शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यातच शिंदे यांनी सावंत यांना निरोप पाठवत तातडीने मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे सावंत यांचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Eknath Shinde
Vice presidential Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 46 जणांना धक्का; पुण्याचा पठ्ठ्याही सलग दुसऱ्यांदा तोंडावर आपटला

तानाजी सावंत (Tanaji Sawant) नाराज असल्याचा फटका एकनाथ शिंदे यांना धाराशिव व सोलापूर या दोन जिल्ह्यात सहन करावा लागत आहे. विशेषतः काही दिवसापूर्वीच परंडा तालुक्यातील तानाजी सावंत यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार राहुल मोटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार यांच्या पक्षात आले असल्याने आता महायुतीमध्येच तानाजी सावंत यांच्या प्रतिस्पर्ध्याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळेच परंडा तालुक्यातील राजकारण कूस बदलण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी आता डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

Eknath Shinde
BJP, Mahayuti Politics: भाजप निष्ठावंतांपुढे चिंता...ज्यांनी भाजपला केला विरोध, त्यांचाच करावा लागणार प्रचार!

पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली होती. त्यानंतर परत एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तानाजी सावंत यांची नाराजी दूर करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले होते. त्या वेळी या दोन नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे येत्या काळात सावंत नाराजी दूर ठेवून पुन्हा एकदा कामाला लागणार का ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Eknath Shinde
Devendra Fadnavis On Water Issue : छत्रपती संभाजीनगर शहरात वाढीव पाणी आता डिसेंबरला! मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला..

महायुतीमधील तीन पक्षात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी मित्रपक्षातील नेत्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे. त्यामाध्यमातून भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी सरसावले असून त्यामध्ये कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Uddhav- Raj Thackeray : उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार! निमंत्रण मिळालं, कारणही आहे खास!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com