Shiv Sena vs BJP: शिवसेनेनं निलंबित केलेल्या नेत्याला भाजपनं हेरलं... निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेचं राजकारणचं फिरवलं!

Shiv Sena suspended leader News : गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीकडून महायुतीकडे जोरदार इनकमिंग होत असतानाच आता महायुतीमधील भाजप व शिवसेना या मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.
Eknath shinde & devendra Fadanvis
Eknath shinde & devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे सर्वांचे निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीकडून महायुतीकडे जोरदार इनकमिंग होत असतानाच आता महायुतीमधील भाजप व शिवसेना या मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. त्यातच पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांसह दहा जिल्हा परिषद सदस्य, ५२ सरपंच व उपसरपंचानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेतेमंडळींना फोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेतून (Shivsena) राजकीय कारकीर्द सुरु केलेल्या पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण खाली ठेवत भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
CJI Bhushan Gawai : "खूप त्रास झाला, बरं झालं ते रिटायर झालेत"; माजी न्यायमूर्तींच्या निवृत्तीवर सरन्यायाधीशांचा सुटकेचा निश्वास

काही दिवसापूर्वीच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे कोकणासह पालघर जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढली होती. विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शिवसेनेत बंडखोरी करीत जिजाऊ संस्थेकडून निवडणूक लढवली होती.

अखेरच्या टप्प्यात जिजाऊ संस्थेने निकम यांची साथ सोडल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी शिवसेनेने निकम यांचे पक्षातून निलंबन केले होते. त्यामुळेच आता निकम यांनी त्यांच्या नेतेमंडळींसह शिवसेना सोडत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
BJP News : लातूरमधील 52 हजार लाडक्या बहि‍णींनी देवेंद्र फडणवीसांना पाठवल्या राख्या!

मित्रपक्षातच रंगणार वाद

पालघर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत शिवसेनेतील इतर सहकाऱ्यानी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वीच या प्रवेश सोहळ्यामुळे मित्रपक्षात वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

Eknath shinde & devendra Fadanvis
Mumbai BMC election: मुंबई महापालिकेच्या 'या' 50 जागा ठरणार गेमचेंजर! मुस्लिम मतदारांच्या हाती सत्तेच्या चाव्या!

महायुतीमध्ये पडला मिठाचा खडा

त्यातच आता या प्रवेश सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी या प्रवेश सोहळ्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आयांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगून शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
Jayant Patil Exclusive : रिलॅक्स झालेले जयंत पाटील म्हणतात, 'रेंजमध्ये आल्यावर टप्प्यात कार्यक्रम...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com