
Mumbai News : छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू झाला असून तो विधीमंडळापर्यंत गेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवशनात याचे पडसाद उमलेले आहेत. सोमवारी (ता.17) रात्री नागपुरात भडकलेल्या दंगलीचे पडसाद सभागृहात उमटले. यावेळी विरोधकांनी महायुतीला घेरताना या घटनेला महायुती सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच या घटनेला मंत्री नितेश राणे यांची वक्तव्य कारणीभूर असून त्यांना कोणाची सूट आहे, कोणाचे बळ आहे असा सवाल केला. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी नितेश राणेंना तंबी करत वादग्रस्त वक्तव्यावरून दम भरल्याची चर्चा सुरू आहे.
हिंदुत्ववादी संघटनांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांची मागणी औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी होत आहे. हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता असून नागपूरात सोमवारी दंगल झाली. यादरम्यान मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेबची कबर राज्यात अजून किती दिवस राहते, ते लवकरच कळेल असे वक्तव्य केलं होते. तर त्यांच्या या इशाऱ्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव मोहिम हाती घेण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता ही दंगल घडली आहे.
यावरूनच विरोधकांनी सरकारला घेरताना मंत्री नितेश राणे यांच्या विविध भडकावू वक्तव्यामुळेच नागपूर दंगल घडल्याचा दावा केला. तर याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा करताना सरकारवर गंभीर आरोप केले. या दंगलीला महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जातय", असाही दावा आंबेडकर यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी थेट नितेश राणे, निलेश राणेंचं नाव घेत त्यांचा बोलवता धनी कोण? असा सवाल केला आहे. भास्कर जाधव यांनी, कोण नितेश राणे? नितेश राणे, निलेश राणेंचा बोलवता धनी कोण? नितेश राणेंच्या मागे एक संघटना आहे. एक व्यक्ती असं करु शकत नाही. यामध्ये संघटना आहे, सरकार आहे. महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
यानंतर आता फडणवीस यांनी नितेश राणेंना विधानभवनतील आपल्या कॅबिनमध्ये बोलवत चांगला दम भरला आहे. फडणवीस यांनी नितेश राणेंना काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची सध्या चर्चा समोर आली आहे. पण त्यांना फडणवीस यांनी नेमके काय सूचना केल्या हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.