Teacher News: अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित प्रस्तावांना वेग; 21 सप्टेंबरपर्यंत डेडलाइन

Kolhapur Zilla Parishad News: अनुकंपा नियुक्तीसाठी प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना आता वेग मिळणार आहे. संबंधित शाळांना प्रस्तावांची कागदपत्रांसह छाननी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी 21 सप्टेंबर 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
Zilla Parishad Teacher
Zilla Parishad TeacherSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Education Department: अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी प्रलंबित असलेल्या प्रस्तावांच्या प्रक्रियेला आता वेग देण्यात आला आहे. अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पात्र ठरणाऱ्या अर्जदारांच्या प्रलंबित प्रस्तावांसोबत जोडलेल्या चेकलिस्टनुसार आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित प्रत घेऊन जिल्हास्तरीय प्रतीक्षासूची तयार करण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना याबाबत पत्र पाठविले आहे. संबंधित पात्र अर्जदारांचे प्रस्ताव तपासून त्यांची शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रक्रियेत एखाद्या शाळेत अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव प्रलंबित नसल्यास, तसा निरंक अहवाल 21 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीत अहवाल सादर न केल्यास संबंधित शाळेतील अनुकंपा नियुक्ती प्रलंबित नाही, असे गृहित धरून पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच विहित मुदतीत कार्यवाही न झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Zilla Parishad Teacher
Maharashtra Government: महसूल अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ ठरली! आता रोज दोन तास नागरिकांच्या तक्रारी ऐकणार

अनुकंपा नियुक्तीसाठी सादर करावयाच्या प्रस्तावांसाठी कार्यालयाने तब्बल 36 बाबींची चेकलिस्ट दिली आहे. यात शाळेचे नाव व संस्थेची माहिती, अर्जदाराचा परिपूर्ण अर्ज, अर्जदाराच्या वयाचा पुरावा, अर्जदाराचे शैक्षणिक कागदपत्र, संयुक्त सहीपत्र, कुटुंबातील सदस्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, मृत कर्मचाऱ्याचा मृत्यू दाखला, सेवापुस्तकातील नोंदी, वेतनश्रेणी व मंजुरी आदेश यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे.

Zilla Parishad Teacher
NCP Maval: राष्ट्रवादीच्या सरपंचासह 6 सदस्य अपात्र! मावळात राजकीय भूकंप; कर थकबाकीचा फटका, भाजपला फायदा?

याशिवाय शाळा अनुदानित अथवा अंशतः अनुदानित असल्याचा आदेश, मृत कर्मचाऱ्याच्या सेवेशी संबंधित कागदपत्रे, नियुक्ती आदेश, शैक्षणिक व जात प्रमाणपत्रे, जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, वारस दाखला, संस्थेचे ठराव, न्यायालयीन प्रकरण नसल्याचे हमीपत्र तसेच प्रस्तावातील कागदपत्रे सत्य व खरी असल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रेही आवश्यक आहेत. त्यामुळे प्रलंबित अनुकंपा नियुक्ती प्रकरणांतील प्रस्तावांची कागदपत्रांसह छाननी करून ते वेळेत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 27 जानेवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयासह 4 जून 2026 च्या शासन निर्णयाचा तसेच शिक्षण संचालनालयाच्या संबंधित पत्रांचा संदर्भ देत ही कार्यवाही करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com