Congress Political News : अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वॉर रुम प्रभारींची नियुक्ती केली आहे. हरियाणाची जबाबदारी गोकुळ बुटेल यांच्यावर असणार आहे.
तर, महाराष्ट्राच्या वाॅर रुमची जबाबादारी तमिळनाडूतील खासदारकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्र वॉर रुम प्रभारीची जबाबादरी तमिळनाडूमधले IAS अधिकारी ते खासदार असा प्रवास करणारे शशिकांत सेंथिल यांच्यावर असणार आहे.
वाॅर रुममधून निवडणुकीची रणनिती ठरवण्यात येणार आहेत. तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी वाॅर रुमची असणार आहे. लोकसभेमध्ये यश मिळाल्याने महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे मिळून एकच वाॅर रुम असेल अशी शक्यता होती. मात्र, काँग्रेसने शशिकांत सेंथिल यांच्यावर वाॅर रुमची जबाबदारी टाकून वाॅर रुम स्वतंत्र असतील याचे संकेत दिले आहेत.
तमिळनाडूच्या तिरुवल्लूर लोकसभा मतदारसंघातून शिशिकांत सेंथिल हे विजयी झाले आहेत. शशिकांत हे IAS अधिकारी होते. यूपीएससी परीक्षेत त्यांनी 9वी रँक मिळवली होती. कर्नाटकमध्ये त्यांची पोस्टींग होती.
मात्र, 2019 ला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि 2020 ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2021 मध्ये शशिकांत यांच्यावर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या सेंट्रल वाॅर रुमची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या कामाने राहुल गांधी प्रभावित झाले होते. राहुल गांधी यांच्या जवळील व्यक्तींमध्ये शशिकांत यांचा समावेश होतो.
निवडणुकीमध्ये नागरिक आणि पक्ष यांच्यामध्ये समन्वय असणे फार महत्त्वाचे असते. हा समन्वय साधण्यासाठी तसेच निवडणुकीची धुरा योग्यरित्या हातळ्यासाठी वाॅर रुम महत्वाची असते.
या वाॅर रुमच्या साह्याने ग्राऊंडवर होणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करणे, सोशल मिडिया टीम संभाळणे, प्रचाराला दिशा देणे विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांचा प्रत्युत्तर देणे अशी कामे वाॅर रुमच्या माध्यमातून केली जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.