NCP Pawar Party Pune Movement : फडणवीसांना नाही, तर बायडन यांना बोलवा, पण ..; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष का झालाय आक्रमक

Movement of NCP SharadChandra Pawar Party in Pune : पुण्यातील राजाराम पुलावरील एकेरी उड्डाणपूलाच काम पूर्ण झालेले आहे. त्याच्या उद्घाटन करण्याअभावी हा उड्डाणपूल सुरू करण्यात आलेला नाही. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले.
NCP Pawar Party Pune Movement
NCP Pawar Party Pune MovementSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सिंहगड रस्ता हा वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध झाला आहे. या रस्त्यावरून रोज तब्बल नऊ लाख पुणेकर प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्यावरती वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. यासाठी तीन वर्षापूर्वी महापालिकेने उड्डाणपुलाचं काम हाती घेतले आहे.

यामध्ये दोन उड्डाणपूल तयार करण्यात येणार असून त्यातील राजाराम पुलावरील एकेरी उड्डाणपूलाच काम पूर्ण झालेला असताना त्याचं उद्घाटन करण्याअभावी हा उड्डाणपूल सुरू करण्यात आलेला नाही.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्ष आक्रमक झाला असून आगामी चार दिवसात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला न केल्यास, 13 तारखेला कितीही पोलिस बंदोबस्त असला, तरी हा उड्डाणपूल खुला करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

NCP Pawar Party Pune Movement
Pune News: उड्डाणपूल उद्घाटनावरून भाजप, ठाकरे गट, शरद पवार गट आमने-सामने

प्रशांत जगताप म्हणाले, "पुणेकरांच्या मतावर महापालिका, विधानसभा लोकसभा निवडून येण्यासाठी उड्डाणपुलाचे काम लांबवण्यात आलं आहे. राजाराम ब्रिज येथील एकेरी उड्डाणपुलाचे काम मागच्या दोन महिन्यापूर्वीच या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या उद्घाटनाला येता यावं यासाठी स्थानिक आमदार माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर यांच्या हट्टापोटी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हा उड्डाणपूल खुला करण्याचं टाळत आहेत".

NCP Pawar Party Pune Movement
NCP Politics : पुण्यात अजित पवार गटाचं दबावतंत्र; भाजपच्या 'या' विद्यमान आमदाराच्या जागेवरच डोळा !

कितीही बंदोबस्त ठेवा, 13 तारखेला...

"पुढच्या 4 दिवसांत तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना घेऊन या, नरेंद्र मोदींना आणा नाहीतर, जो बायडन यांना आणा, मात्र हा उड्डाणपूल खुला करा, नाहीतर 13 तारखेला आम्ही कितीही पोलिस बंदोबस्त असला, तरी हा पूल वाहतूकसाठी खुला करणार आहोत, असा इशारा देताच आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचा दबाव झुगारून लावावा", अशी विनंती प्रशांत जगताप यांनी केली.

खड्ड्यांवरून संताप आणि रोष

दरम्यान, सिंहगड रस्त्यावरून तब्बल नऊ लाख नागरिक दररोज प्रवास करतात. याचं अंतर पार करण्यासाठी नागरिकांना जवळपास एक तास लागत आहे. मात्र या वाहतूक कोंडीकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळचं नाही. पुणे शहरात सगळीकडे खड्डे बुजवण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र याला सिंहगड रोड अपवाद ठरला आहे. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. पण यावर ना नेता, ना पदाधिकारी, ना आमदार-खासदार कोणीच प्रशासनाला जाब विचारण्यासाठी तोंडातून शब्द काढण्यास तयार नाही. त्यामुळे आता नागरिकांमध्ये रोष दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com