Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama

Manikrao Kokate : अजित पोवारांनी दिला कृषीमंत्री कोकाटेंना इशारा; म्हणाले, गनिमी काव्याने...

Manikrao Kokate Controversial Statement : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा देतो. असे वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातून शेतकऱ्यांमध्ये कृषी मंत्र्यांच्याविरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
Published on

Kolhapur News, 21 Feb : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा देतो. असे वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातून शेतकऱ्यांमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

अशातच आज ते कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते भीमा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी त्यांनी समस्त शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा कृषी मंत्र्यांविरोधात गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Manikrao Kokate
NCP leaders U-turn : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा 48 तासांतच यू टर्न? 'या' नेत्यावर केले गंभीर आरोप

पुढे बोलताना अजित पोवार म्हणाले, पिक विम्यात घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यामध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. जे सामील आहेत त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई राज्य सरकारने केलेली नाही. सरकार मधलेच मंत्री शेतकऱ्यांना भिकारी, लाचार म्हणत आहेत. या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध केला आहे.

कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधात केलेल्या वक्तव्याचा त्यांना अजून पश्चाताप झालेला नाही. त्यांनी माफी देखील मागितलेली नाही. कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांनी समस्त शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गनिमी काव्याने आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Manikrao Kokate
Ladki Bahini Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर होणार उद्यापासून 1500 रुपये जमा; अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस केला. कृषी पंप धारकांना मोफत विजेची घोषणा केली. मात्र आता शेतकऱ्यांना थकबाकीचे बिले आली आहेत. त्यावरील फोटो देखील गायब केले आहेत. शेतकऱ्यांनी आता वीज बिल भरू नये, असे आवाहन अजित पोवार यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com