Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांना तिरुवनंतपुरममध्ये ऐकायला मिळालं राजकीय भाकीत;'यंदा राज्यात अन् देशात...'

Balasaheb Thorat at the Padmanath Temple in Thiruvananthapuram : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज तिरुवनंतपुरमध्ये पद्मनाथम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथे त्यांना महाराष्ट्रातून आलेली मराठी लोकं भेटली.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsarkarnama

Balasaheb Thorat News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात तिरुवनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) असून, तिथं मराठी माणसं त्यांना भेट आहेत. ही मराठी माणसं या भेटीत राज्यासह देशात काँग्रेसचे सरकार येणार, असे सांगत असल्याचे अनुभव बाळासाहेब थोरात यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज तिरुवनंतपुरमध्ये (Thiruvananthapuram) पद्मनाथम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथे त्यांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेली मराठी लोकं भेटली. लातूर, नाशिक, नागपूर, अकोला, चंद्रपूर, नगर, वर्धा, जालना आदी भागातील माणसं भेटल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ही मराठी माणसं बहुतांशी निमशहरी आणि ग्रामीण भागातील होती. या मराठी माणसांच्या भेटीचा अनुभव बाळासाहेब थोरात यांनी सांगितला.

"ही मराठी लोकं आवर्जुन मला भेटत होती. लांबून पाहून जवळ येत होती. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Elections) बोलत होती. काँग्रेसचं (Congress) सरकार येणार, असं ठाम विश्वासानं सांगत होती. राज्यात आणि देशात काँग्रेसचं सरकार बसणार. हेच सरकार गरिबाचं कल्याण करणार, असे सांगून जात होती", असे बाळासाहेब थोरात यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. देशात आणि राज्यात काँग्रेसच लोकांचा विश्वास देऊ शकते, असेही थोरात यांनी ठामपणे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि राज्यातील दिग्गज नेते आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा रोल होता. तसेच लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना त्यांनी राज्यात महाविकास आघाडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना राज्यात महाविकास आघाडी एकसंघ दिसली. यात देखील बाळासाहेब थोरात 'किंगमेकर'च्या भूमिका दिसले.

Balasaheb Thorat
Ahmednagar News : पाचशे वर्षांच्या परंपरेला तडा जाणार? अहमदनगर ते अहिल्यानगर; नामांतरानंतरही दोन स्थापना दिवस...

राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका झाल्या. या पाचही टप्प्यात बाळासाहेब थोरातांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले. आता सहाव्या आणि सातव्या टप्प्यात उत्तर भारतात निवडणुका होत आहेत. तिथे प्रचारासाठी राज्यातील काँग्रेस नेते सहभागी झाले आहेत. प्रचाराबरोबर धार्मिक स्थळांना भेटी देत देवदर्शनाला हजेरी लावत आहेत.

Balasaheb Thorat
Vikhe V/S Lanke : सट्टेबाजारात विखे-लंके यांच्यात चुरस, एवढा फुटला भाव; पैजांची रक्कम पोहोचली लाखापर्यंत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com