Sillod Assembly Election : निवडून आल्यानंतरही सत्तारांची साडेसाती संपेना; सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल

Petition filed in court against Abdul Sattar : सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या नामनिर्देशन पत्रा सोबत सादर केलेल्या शपथपत्रावर मतदानापूर्वीच लेखी आक्षेप घेतला होता.
Abdul sattar Court News
Abdul sattar Court NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे माजीमंत्री अब्दुल सत्तार हे यावेळी कसबसे निवडून आले. महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांनी सत्तार यांना शेवटपर्यंत झुंजवले आणि अवघ्या 2420 मतांनी त्यांचा विजय झाला. निवडणुक मतमोजणी दरम्यान अब्दुल सत्तार यांनी घोळ केल्याची चर्चा मतदारसंघात अजूनही सुरू आहे. अशातच सत्तार यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

भराडी येथील निम्न प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच स्थगिती दिली. पाचशे कोटींहून अधिकचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प स्थगित झाल्यामुळे सत्तार बॅकफुटवर गेले असताना आता त्यांना आणखी एका नव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Abdul sattar Court News
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या कारभाराला न्यायालयाचा पुन्हा दणका; सरकारी तिजोरीतील 535 कोटी 'सेफ' राहणार

सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या नामनिर्देशन पत्रा सोबत सादर केलेल्या शपथपत्रावर मतदानापूर्वीच लेखी आक्षेप घेतला होता. (Shivsena) निवडणूक आयोगाने यावर अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळे शपथपत्रात खोटी, भ्रामक आणि दिशाभूल करणारी माहिती देणे हा लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 125 अ नुसार गुन्हा आहे.

Abdul sattar Court News
ShivSena Politics : 'गृहखात्यावर 'डॅशिंग' माणूस असावा अन् अर्थ खातं 'सक्षम' माणसाकडे..!', संजय शिरसाटांना सुचवायचंय तरी काय?

तक्रारीबाबत आयोगाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे या प्रकरणात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक निवडणुकीत खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली आहे. मतदारांची फसवणूक होऊन मानवाधिकार हक्काचा भंग होत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत अब्दुल सत्तार अब्दुल नबी व निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ इब्राहिम पठाण यांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे.

Abdul sattar Court News
Mahayuti Cabinet Formula : भाजपला 20, अजितदादांना 10 मंत्रिपदं, एकनाथ शिंदेंना किती? महायुतीचा फाॅर्म्युला ठरला!

काही दिवसापूर्वी महेश शंकरपेल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातील चुका असल्याचे सांगत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यात त्यांनी सत्तारांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्ता यामध्ये तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ हे चुकीचे दाखवण्यात आले आहे. काही मालमत्तेची माहिती शपथ पत्रातून गायब करण्यात आली आहे.

Abdul sattar Court News
Mahavikas Aghadi : 'मी हे मान्य करणार नाही...'; काँग्रेसच्या नेतृत्वात 'मविआ'चं सरकार, पटोलेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा आक्षेप

विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सबाबतही खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप केला होता. राज्यातील नव्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. कोणाला मंत्री करायचे याच्या याद्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीकडून तयार केल्या जात आहे. अशा महत्वाच्या वेळी सत्तार यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने त्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com