Congress Politics : मुख्यमंत्रि‍पदाबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, रमेश चेन्नीथलांनी एका वाक्यात विषय संपवला

Congress Politics uddhav thackeray Ramesh Chennithala CM : महाविकास आघाडी एकत्र म्हणून निवडणूक लढणार आहोत. जागावाटप बाबत दोनदा चर्चा झाल्या आहेत. लवकरच पुन्हा एक बैठक होणार आहे, असे चेन्नीथला यांनी सांगितले.
 uddhav thackeray Ramesh Chennithala
uddhav thackeray Ramesh Chennithalasarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असे आवाहन केले आहे. यावर दोन्ही काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.

आता काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणुकीनंतर ठरवला जाईल, असे सांगून हा विषय संपवला. याशिवाय आम्ही कोणालाही मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट करणार नाही, असेही स्पष्ट केले.

काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) नागपूरमध्ये बदलापूरच्या घटनेचा निषेध आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. रमेश चेन्नीथाला यांनी या आंदोलनाला भेट दिली. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

 uddhav thackeray Ramesh Chennithala
Sharad Pawar : कोल्हापुरात शरद पवार तीन दिवसांत कुणाचा खेळ बिघडवणार? धक्के बसणार हे निश्चित...

आम्ही सर्वांना घेऊन चालू आणि आघाडीचा धर्म पाळू. महाविकास आघाडी एकत्र म्हणून निवडणूक लढणार आहोत. जागावाटप बाबत दोनदा चर्चा झाल्या आहेत. लवकरच पुन्हा एक बैठक होणार आहे. त्यात आम्ही जागवाटपाचे धोरण निश्चित करणार आहोत, असे चेन्नीथला म्हणाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकत्ता येथे घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील बदलापूर येथे घडलेलेल्या घटनेवरही त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे. राष्ट्रपती या देशाच्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भलेही छत्रपतींच्या पुतळ्यासंदर्भात माफी मागितली असेल मात्र महाराष्ट्रची प्रतिमा आणि पुतळा कोणी बनवला? ही दुर्घटना कशी झाली? याचाही चौकशी करावी, असे चेन्नीथला म्हणाले.

महाराष्ट्राचा जो अपमान झाला त्यावर केवळ माफी मागून चालणार नाही तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. पुतळा पडल्याने जनतेच्या पैसा वाया गेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून याची चौकशी करावी, अशी मागणी देखील चेन्नीथाला यांनी केली.

(Edited By Roshan More)

 uddhav thackeray Ramesh Chennithala
Rajkot Fort Incident News : राणेंच्या पोकळ धमक्या, शिवसैनिक घुसले असते तर त्यांचाच चेंदामेंदा झाला असता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com