Congress : घोडा पळाल्यानंतर तबेला केला बंद, भाजप मुख्यमंत्र्यांचा राजीनाम्यावर काँग्रेसचा टोला

Mallikarjun Kharge reaction to Manipur CM resignation : काँग्रेसने एन बिरेन सिंह यांचा राजीनामा उशिरा घेतलेला निर्णय असल्याचे सांगत भाजपच्या अपयशावर टीका केली आहे.
Narendra Modi, Mallikarjun Kharge
Narendra Modi, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Congress News : मणिपूरच्या मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने हा राजीनामा उशिरा घेतलेला निर्णय असल्याचे सांगत भाजपच्या अपयशावर टीका केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एन बिरेन सिंह यांचा राजीनामा म्हणजे घोडा पळून गेल्यानंतर तबेल्याचा दरवाजा बंद करण्याचा प्रकार आहे. भाजपने 21 महिन्यांपासून मणिपूरमध्ये अस्थिरता निर्माण केली आणि जनतेला संकटात टाकले. त्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि राजधर्माच्या पूर्ण दुर्लक्षामुळे 258 लोकांचे प्राण गेले.

मणिपूर पोलिसांच्या शस्त्रागारातून 5 हजार 600 हत्यारे आणि 6.5 लाख जिवंत दारूगोळा लुटला गेला, 60 हजाराहून अधिक लोक बेघर झाले आणि हजारो जण अद्याप मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची जाग आल्याचा टोलाही खर्गे यांनी लगावला.

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Shivsena Mission Tiger : कोकणात 'मिशन टायगर' 100 टक्के यशस्वी, ठाकरेंवरील संकटं संपतच नाहीत!

खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, "मोदीजी हे या उदासीनतेचे खरे जबाबदार आहेत. त्यांनी मणिपूरला भारताचा भाग मानणेच सोडून दिले आहे. त्यांनी अनेक विदेशी दौरे केले, पण मणिपूरला भेट द्यायला वेळच नाही"

काँग्रेसच्या अविश्वासामुळे राजीनामा

खर्गे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की "2023 प्रमाणे बनावटी राजीनाम्याचा हा प्रकार नसून या वेळी काही प्रमाणात समजूतदारपणा दाखवला गेला आहे. लोकांचा दबाव, काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास ठराव आणि सुप्रीम कोर्टाच्या तपासामुळे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे पायउतार झाले."

मोदींनी मणिपूरला भेट द्यावी

मोदींनी स्वतः मणिपूरला भेट द्यावी आणि तेथील पीडितांचे दुःख ऐकावे, अशी मागणी देखील खर्गे यांनी केली आहे. तसेच मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अस्थिरतेत आता काही बदल होतो का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, असे देखील खर्गेंनी म्हटले आहे.

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Manipur Politics : मणिपूरमध्ये शहांकडून सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट; मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर आता कोणती खेळी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com