Shivsena Mission Tiger : कोकणात 'मिशन टायगर' 100 टक्के यशस्वी, ठाकरेंवरील संकटं संपतच नाहीत!

Rajan Salvi likely to join Eknath Shinde Shivsena :उद्धव ठाकरेंसाठी शिवसेनेसाठी अस्थित्वाची लढाई निर्माण झाली आहे. पूर्ण कोकण पट्ट्यात गु्हागरमध्ये भास्कर जाधव हे एकमेव आमदार आहेत. तर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकही आमदार ठाकरेंकडे नाही.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Mission Tiger : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरील संकटे संपण्याचे नावच घेत नाहीत. ज्या कोकणाने बाळासाहेब ठाकरे यांना शेवटपर्यंत साथ दिली. त्याच कोकणाच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. त्यांचे पक्षाचे दोन माजी आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. तर, ईडीचे संकट असूनही विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना साथ देणारे राजन साळवी देखील ठाकरेंची साथ सोडणार आहेत.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,कोकणात मिशन टायगर 100 टक्के यशस्वी होणार आहे. उद्धव ठाकरेंकडे कोकणात कोणीच शिल्लक राहणार नाही. शिवसेना कोणाची हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच शिवसैनिक आमच्याकडे येत आहेत.

उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम हे 13 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेंना साथ देणारे शेकडो शिवसैनिक पदाधिकारी देखील एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Maharashtra Politics : 'जयंत पाटील नीच अन् कपटी, त्यांचा टप्यात आणून करेक्ट कार्यक्रम करू; आमदार पडळकरांची जहरी टीका

कोकणात अस्तित्वाची लढाई

उद्धव ठाकरेंसाठी शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. पूर्ण कोकण पट्ट्यात गु्हागरमध्ये भास्कर जाधव हे एकमेव आमदार आहेत. तर, तळ कोकणातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, रत्नागिरी, राजापूर, चिपळून, कणकवली सहा मतदारसंघात ठाकरेंचा एकही आमदार नाही. शिवाय जे पदाधिकारी, नेते विधानसभेला सोबत होते ते देखील पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत.

राजन साळवींना विधान परिषद?

राजन साळवी हे 23 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या विषयी साळवी यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया अजुनपर्यंत आलेली नाही. साळवी यांना विधान परिषद मिळणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

साळवींच्या प्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध?

राजन साळवी यांच्या प्रवेशाबाबत मंत्री उदय सामंत म्हणाले की, या संदर्भात माझी एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा झाली नाही. साळवींच्या इच्छा आकांक्षा काय आहेत हे माहीत नाही. माझे मोठे बंधू तेथून विजय झाले आहेत त्यांना विश्वासत घ्यावे लागेल. तर, किरण सामंत म्हणाले की, राजन साळवी शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत. पण त्यांना पटकन पक्षात घेतली असे मला वाटत नाहीत. तसेच लगेच विधान परिषद देतील असे देखील वाटत नाही.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Ambadas Danve On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची ताकद 'बाहुबली' देवेंद्र फडणवीसांच्या बाहुत नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com