Congres : IPS विश्वास नांगरे पाटलांवर 'अविश्वास', मुख्यमंत्रीही टार्गेटवर; काँग्रेसने विचारले 'ते' 6 बोचरे प्रश्न विचारले!

Congress Questions IPS Officer Vishwas Nangare Patil : सकल हिंदू समाजाच्या व्यासपीठावर जात भाषण करणाऱ्या आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना काँग्रेसने सहा प्रश्न विचारले आहेत.
Congress Questions IPS Officer Vishwas Nangare Patil
Congress Questions IPS Officer Vishwas Nangare Patilsarkarnama
Published on
Updated on

Congress News : सकल हिंदू समजाच्या मंचावर जात भाषण केल्यानंतर वादात सापडलेल्या IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले होते. आपण कुठल्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या उत्तरानंतरही काँग्रेसने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत सोशल मीडियामधून त्यांना सहा प्रश्न विचारले आहेत.

नांगेर पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही हे सहा प्रश्न विचारताना हिंमत असेल तर संविधानिक उत्तरे द्यावीत, उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत. नाही तर सिद्ध होईल की तुम्ही लोकशाही नाही, 'पेशवाई सरकार' चालवता आहात, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने विचारलेले प्रश्न हे प्रश्न ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट नियमांच्या अनुषंगाने आहेत.

१. सरकारची पूर्वपरवानगी होती की मर्जी?

सदर खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गृह विभाग किंवा राज्य सरकारची रीतसर पूर्वपरवानगी घेतली होती का; आणि नसल्यास नियमांच्या उघड उल्लंघनाबद्दल सरकार काय कारवाई करणार?

२. Rule 3(1) ची पायमल्ली का केली?

पोलीस दलातील जबाबदार अधिकाऱ्याने कायद्याचे रक्षक म्हणून राहण्याऐवजी, विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिच्या विचारसरणीचे जाहीर उदात्तीकरण करणे पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे आहे का?

३. राजकीय तटस्थता की राजकीय निष्ठा?

सेवा नियमांनुसार राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक असताना, संघाच्या मंचावरून कौतुक करणे ही 'तटस्थता' आहे की विशिष्ट विचारप्रवाहाशी जाहीर निष्ठा (Political Loyalty) व्यक्त करणे आहे?

४. संविधान सर्वोच्च की संघ विचार?

संविधानाच्या सर्वोच्चतेशी बांधील असणाऱ्या संवैधानिक पदावरील अधिकाऱ्याने, एका विशिष्ट विचारधारेच्या मंचावर जाऊन तिचे जाहीर गुणगान करणे हा थेट संविधानाचा अवमान नाही का?

५. Rule 3(2B)(vi) : प्रभावाखाली जाण्याची शंका

सार्वजनिक मंचावरून विशिष्ट विचारधारेचा गौरव करणाऱ्या अधिकाऱ्याकडून, उद्या कायदा-सुव्यवस्था राखताना किंवा निर्णय घेताना पूर्वग्रहदूषित वर्तन होणार नाही याची खात्री महाराष्ट्राला कोण देणार?

६. सर्वात गंभीर आणि कायदेशीर प्रश्न (Rule 5(1))

राजकारणात भाग घेणाऱ्या संघटनेशी कोणत्याही प्रकारे 'संबंधित' राहण्यास नियमाने बंदी असताना, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बनून गुणगान करणे हा सेवा नियमांचा थेट भंग मानला जाणार नाही का?

Congress Questions IPS Officer Vishwas Nangare Patil
Government officials controversy : विश्वास नांगरे पाटलांवरून वाद सुरू असतानाच भाजपच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत; म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर अधिकारी RSS...

संविधानाच्या चौकीटीत उत्तर द्या

काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत म्हटले आहे की, उत्तर द्या मुख्यमंत्री महोदय, कायदा सर्वांसाठी समान आहे की तुमच्या मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी ऑल इंडिया सर्व्हिसेसचे नियम बाजूला ठेवले जातात? महाराष्ट्राला उडवाउडवीची उत्तरे नकोत, संविधानाच्या चौकटीतली उत्तरे हवी आहेत!

Congress Questions IPS Officer Vishwas Nangare Patil
Government officials controversy : विश्वास नांगरे पाटलांवरून वाद सुरू असतानाच भाजपच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत; म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर अधिकारी RSS...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com