Government officials controversy : विश्वास नांगरे पाटलांवरून वाद सुरू असतानाच भाजपच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत; म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर अधिकारी RSS...

Kailash Vijayvargiya, MP minister statement : भारतीय घटनेनुसार, प्रत्येक सरकारी अधिकारी हा केवळ संविधानाशी निष्ठावंत असला पाहिजे, कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारधारात्मक संघटनेशी नव्हे, अशी टीका काँग्रेसने केली आहे
Congress vs Vishwas Nangare Patil
Congress vs Vishwas Nangare PatilSarkarnama
Published on
Updated on

RSS controversy : महाराष्ट्रातील IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली होती. नांगरे पाटील यांच्याकडून आरएसएसचे कौतुक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात भाजपच्या बड्या नेत्यानं शासकीय अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना वाद ओढवून घेतला आहे. राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) आपली जवळीक दाखवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, असा दावा विजयवर्गीय यांनी केला आहे. त्यावर आता काँग्रेसकडूनही पलटवार करण्यात आला आहे.

काय म्हणाले विजयवर्गीय?

विजयवर्गीय यांचा एका अधिकाऱ्याशी बोलताना व्हिडिओ समोर आला आहे. ते म्हणतात, RSS शी संबंध असल्याचे दाखवण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. पण संघटनेत आता खूपच गर्दी झाली आहे आणि चांगल्या लोकांची कमतरता जाणवत असल्याचेही विजयवर्गीय म्हणाले.

Congress vs Vishwas Nangare Patil
Kiren Rijiju news : पंतप्रधानांना खोटारडे म्हणणे ब्रिटनच्या महिला खासदाराला पडलं महागात; किरेन रिजिजू यांच्याकडून 'तो' व्हिडिओ पोस्ट

'आमची सत्ता आल्यानंतर एक अधिकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी शाखेत जायचो. मी त्यांना म्हटलं, आमचे सरकार येण्यापूर्वी हे कधी सांगितले नाही,' हा किस्सा सांगतच विजयवर्गीय यांनी प्रत्येक अधिकारी संघाशी आपला संबंध दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. आमची सरकार आल्यानंतर सगळेच आरएसएसमध्ये गेले, असेही विजयवर्गीय म्हणाले.

Congress vs Vishwas Nangare Patil
चर्चा CM विजय-त्रिशा यांच्या लग्नाची अन् माजी मुख्यमंत्र्यांनी बांधली अभिनेत्रीशी लग्नगाठ

विजयवर्गीय यांच्या या विधानावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी टीका केली आहे. व्हिडिओ पोस्ट करत पटवारी यांनी म्हटले आहे की, सार्वजिनिक व्यासपीठावर असे वक्तव्य करणे म्हणजे गंभीर घटनात्मक प्रश्न निर्माण करणारे आहे. राष्ट्रपती आणि राज्यपालांनी याची दखल घेण्याचे आवाहनही पटवारी यांनी केले आहे. भारतीय घटनेनुसार, प्रत्येक सरकारी अधिकारी हा केवळ संविधानाशी निष्ठावंत असला पाहिजे, कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारधारात्मक संघटनेशी नव्हे, असेही पटवारी म्हणाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com