Political News : राज्यात नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळवा; 'हे' दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता?

Assembaly Election News : महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप सुरु झाले आहे. त्यातच आता राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरु झाल्याचे दिसत आहे.
Prakash Ambedkar, Ravikant Tupkar
Prakash Ambedkar, Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. येत्या काळात लवकरच निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे गृहीत धरून प्रत्येक पक्ष आता जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. एकीकडे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप सुरु झाले आहे. त्यातच आता राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरु झाल्याचे दिसत आहे.

निवडणुका डोळयांसमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकरांसोबत चर्चा करीत असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर रविकांत तुपकरांना (Ravikant Tupkar) सोबत घेण्याची चाचपणी करत आहेत. तुपकरांनी बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. (Political News)

लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून तब्बल अडीच लाख मते घेतली होती. आंबडेकर व तुपकर या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या जरी प्रत्यक्ष चर्चा झाली नसली तरी प्राथमिक बोलणीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आगामी काळात नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

27 जिल्ह्यात तुपकरांचे संघटन सक्रिय

काही दिवसापूर्वी राजू शेट्टींनी तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यानंतर राज्यातील 27 जिल्ह्यात रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते आणि संघटन सक्रिय झाल्या आहेत. तर दुसरीकडे तुपकरांशिवाय राज्यातील तिसरी आघाडी अपूर्ण असल्याचे मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले होते. त्यामुळे सर्वांचे दोन्ही पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष्य लागले आहे.

Prakash Ambedkar, Ravikant Tupkar
Ajit Pawar News : 'दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही'; अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक

प्रस्तावित युतीकडे लागले सर्वांचे लक्ष

येत्या काळात प्रकाश आंबेडकर आणि रविकांत तुपकर एकत्र आल्यास त्याचा फायदा पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही गटात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप रविकांत तुपकर आणि प्रकाश आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट आणि चर्चा होणे बाकी असल्याचे समजते. दोन्ही नेत्यांच्या प्रस्तावित युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या काळात होत असलेल्या निवडणुकीवर होणार आहे.

Prakash Ambedkar, Ravikant Tupkar
Supriya Sule News : राज्याचा मुख्यमंत्री कसा व्हावा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com