Sachin Sawant On Devendra Fadnavis : फडणवीस 'वोट जिहाद'वर बोलले; काँग्रेसचे सावंत म्हणाले, 'संविधानाची शपथ...'

Sachin Sawant of Congress criticizes Devendra Fadnavis statement on Vote Jihad : कोल्हापूर इथल्या कार्यक्रमात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादवर बोलताच काँग्रेस प्रवक्ता सचिव सावंत यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोल्हापूर इथल्या एका कार्यक्रमात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादचा उल्लेख करत एका धर्माविषयी भूमिका स्पष्ट केली. यावर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.

काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी फडणवीस यांची भाषा अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका केली. तसंच भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या मतांचा अवमान फडणवीसांनी केला असून, संविधानाची शपथ विसरलात, त्याची आठवण सचिन सावंत यांनी करून दिली.

सचिन सावंत यांनी व्हिडिओ शेअर करत देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद शब्द वापरून संविधानाचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) संविधानिक पदावर आहेत. त्यांनी असा शब्दप्रयोग करणे हे दुर्दैवी आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
Nagpur ZP : नागपूर ZP चा भाजप आमदारांना दणका; विधानसभेच्या तोंडावर ‘ना हरकत’ला नकार

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून प्रत्येकाला मतांचा अधिकार दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विधान म्हणजे, तो या अधिकाराचा अवमान आहे. संविधनाचा अवमान आहे. देवेंद्र फडणवीस संविधानिकपदावर आहेत. त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. त्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला आहे, असा गंभीर आरोप (Congress) सचिन सावंत यांनी केला आहे.

Devendra Fadnavis
Ashok Chavan News : पटोलेंच्या दणक्याने अशोक चव्हाण घायाळ, समर्थक नगरसेवकांच्या हकालपट्टीवर संतापले

राणे, रामगिरींना पाठिशी घालू नका

"मुस्लिम समाज भाजपला का मतदान करत, याची चिंता करायला हवी. तुम्ही मुस्लिमांविषयी द्वेष पसरविणारे रामगिरी महाराज आणि आमदार नीतेश राणे यांना पाठिशी घालता, आणि दुसऱ्या ठिकाणी मुस्लिम सणानिमित्तानं दोन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा करता, हा विरोधाभास भाजपच्या कार्यपद्धतीत दिसतो", असा टोला सचिन सावंत यांनी लगावला.

फडणवीसांना शपथेची आठवण करून दिली

मुस्लिम मत पाहिजे असतील, रामगिरी महाराज आणि आमदार नीतेश राणे यांना पाठिशी घालणं सोडून द्या. त्यांच्याविरोधात कारवाई करा. धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या व्यक्तीला गजाआड घालण्याची हिंमत बाळगा. हे जर होत नसेल, थैयथैयाट करणं योग्य नाही. तुम्ही कितीही संविधानाची मंदिर उभारली, तरी संविधान स्वतःच्या जीवनाचा भाग न बनविल्यास काही होणार नाही, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदावेळी घेतलेल्या शपथेची आठवणी सचिन सावंत यांनी करून दिली.

'वोट जिहाद'वर काय म्हणाले फडणवीस

कोल्हापूर इथल्या कार्यक्रमात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वोट जिहाद'वर विधान केले. "देशात पुन्हा एकदा सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. हे अनेकांना पहावत नाही. त्यामुळे हिंदू विरोधकांनी हिंदू विरोधी जागतिक वातावरण तयार करण्याचे षडयंत्र रचले आहे. लव्ह जिहाद पाठोपाठ वोट जिहादचा प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले. त्यामुळे संत शक्तीने हिंदू विरोधकांच्या मुकाबला करण्यासाठी पाठबळ द्यावे", असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com